Fawad Khan At Mahira Khan Sangeet  Instagram
मनोरंजन बातम्या

Mahira Khan Wedding Video: माहिरा खानच्या लग्नात फवाद खानची एन्ट्री; नवीन व्हिडीओने चाहत्यांचं वेधलं लक्ष

Mahira and Fawad Khan: माहिरा आणि फवाद यांची 'हमसफर' मालिके देखील खूप प्रसिद्ध आहे.

Pooja Dange

Fawad Khan Attend Mahira Khan's Wedding Function:

अभिनेत्री माहिरा खान नुकतीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. माहिरा खानच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान माहिरा खानच्या लग्नातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता फवाद खान देखील दिसत आहे.

माहिरा खानने स्वतःच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करून फॅन्सची उत्सुकता वाढवली आहे. माहिराने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ तिच्या संगीत सेरेमनीचा आहे. या व्हिडीओमध्ये फॅन्सला तिच्या हमसफर मालिकेतील सहकलाकार फवाद खान देखील दिसत आहे.

माहिरा खानने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिच्या संगीत सेरेमनीची संपूर्ण झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये माहिरा खानने सुंदर लेहेंगा घेतला आहे. तर तिचा पती सलीम करीमने ब्लॅक शेरवानीमध्ये दिसत आहे.

माहिराच्या संगीत कार्यक्रमाला अनेक पाकिस्तानी कलाकारांनी हजेरी लावली असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये सगळे पाहुणे संगीत कार्यक्रमात थिरकताना दिसत आहेत. या पाहुण्यांमध्ये अभिनेता फवाद खानची झलक सुद्धा पाहायला मिळत आहे. फवाद या व्हिडीओमध्ये भावनिक झाल्याचे दिसत आहे.

माहिरा खानने याआधी तिच्या मेहेंदीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये माहिराचा मुलगा अजलान तिला कार्यक्रमाला घेऊन येताना दिसत आहे.

माहिराने तिच्या हळदीचे, मेहेंदीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले असून ते त्यांचे प्रेम लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.

माहिरा खान आणि फवाद खान पाकिस्तानातच नाहीतर भारतात देखील खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. या दोघांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय माहिरा आणि फवाद यांची 'हमसफर' मालिके देखील खूप प्रसिद्ध आहे. त्या मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे फवादला माहिराच्या लग्नात पाहून त्यांचे चाहते खूप आनंदी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT