Alia bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

आलिया भट्टचा व्हिडीओ पाकिस्तानमध्ये झळकला; जाणून घ्या प्रकरण

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन बरेच महिने लोटले आहेत. दरम्यान, 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमावरून पाकिस्तातून (Pakistan) एक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमाला भारतासहित जगभरातील लोकांनी पसंती दर्शवली. या सिनेमातील काही दृष्यामुळे वाद-विवादही झाले. 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात आलिया भट्टने गंगूबाई या पात्राची भूमिका साकारली आहे. या सिनेमात वैश्यांची संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन बरेच महिने लोटले आहेत. दरम्यान, 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमावरून पाकिस्तातून (Pakistan) एक बातमी समोर आली आहे. ( Alia bhatt news In Marathi )

पाकिस्तानात एका रेस्तराँमध्ये ग्राहकांना बोलवण्यासाठी 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातील एका दृष्याचा आधार घेतला आहे. 'स्विंग्स' रेस्तराँकडून थेट गंगूबाई या पात्रातील आलिया भट्टचा फोटो आणि व्हिडीओचा गैरवापर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या सिनेमात गंगूबाईची भूमिका साकारणारी आलिया भट्ट ग्राहकांना इशारा देऊन बोलावते, त्या दृष्याचा आधार पाकिस्तानात एका रेस्तराँने घेतला आहे. तसेच 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील दृश्याचा हा व्हिडीओ देखील रेस्तराँच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

तसेच रेस्तराँच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे की,' ये ना रे राजा, का वाट पाहत आहेस ? सर्व राजांना आवाज देत आहे. या राजांनो सोमवारी पुरुषांना २५ टक्के सूट आहे. त्याचा लाभ घ्या'. रेस्तराँ मालकाची मार्केटींग स्ट्रॅटेजी त्यांनाच महागात पडली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानातील रेस्तराँला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. ट्रोल करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'तुम्ही तुमच्या रेस्तराँच्या मार्केटिंगसाठी एका सिनेमाचं दृश्य कसं वापरू शकता ?,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात धुव्वाधार पावसाची हजेरी

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, बाजार समितीतही नुकसान

Kolhapur Madhuri Elephant : माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Saturday Horoscope : आज कोणत्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या शनिवारचे राशीभविष्य

Pitru Paksha 2025: पितृपक्ष काळात स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, जाणून घ्या त्यांचे महत्त्व

SCROLL FOR NEXT