ott platform Saam Tv
मनोरंजन बातम्या

New OTT Releases This Week: अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट, वेबसीरिज लवकरच ओटीटीवर येणार, चित्रपटप्रेमींसाठी खास मैफल...

प्रेक्षकांना आता चित्रपटगृहांपेक्षा घरी बसून चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला सर्वाधिक आवडतात.

Chetan Bodke

New OTT Releases This Week: प्रेक्षकांना आता चित्रपटगृहांपेक्षा घरी बसून चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला सर्वाधिक आवडतात. यामुळेच प्रेक्षक नवीन चित्रपट आणि वेबसीरिज OTT वर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत ख्रिसमसनंतरचा आठवडाही प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असणार आहे.

या आठवड्यातही अनेक बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट ओटीटीवर येणार आहेत. ते चित्रपट आणि वेबसीरिज कोणते आहेत? बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घेऊया कोणकोणते चित्रपट आणि वेब सीरिज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत?

Varun Dhawan Bhediya Movie

Bhediya

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेला 'भेडिया' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर OTT प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. OTT वर वरुण धवनच्या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. हा सिनेमा Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Aar Ya Paar

Aar Ya Paar

'आर या पार' या हिंदी चित्रपटात आदित्य रावलने मुख्य भूमिका साकारली आहे. 'आर या पार' चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी 'Disney Plus Hotstar' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Rise Of Empires Ottoman Season 2

Rise Of Empires Ottoman Season 2

'राईज ऑफ इम्पायर ऑट्टोमन'चा आगामी भाग अर्थात दुसरा सीझन येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ही ऐतिहासिक वेब सीरिज असून या वेब सीरिजमध्ये ऑटोमन सुलतान मोहम्मद दुसरा याच्या आयुष्या संबंधित अनेक बाबी यात दाखवण्यात आल्या आहे. या सीझनमध्ये पुन्हा एकदा इतिहासाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ही वेबसीरिज 29 डिसेंबर रोजी Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Gannibal

Gannibal

गॅनीबल हा जपानी शो आहे. एका काल्पनिक गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या चित्तथरारक कथेवर आधारित आहे. हा शो प्रेक्षक Disney Plus या OTT प्लॅटफॉर्मवर 28 डिसेंबरपासून पाहू शकता.

Treason

Treason

'ट्रीसन' वेब सीरिजची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता २६ डिसेंबरला संपणार आहे. ही रोमांचकारी वेबसीरिज Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT