List of OTT Released This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Released This Week : थ्रिलर, कॉमेडी, हॉररपट आणि बरंच काही! 'या' आठवड्यात चित्रपट, वेबसीरीज होणार रिलीज; एकदा लिस्ट बघाच...

Chetan Bodke

चाहत्यांकडून ओटीटीला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक आठवड्यामध्ये, ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरीज आणि वेब शो रिलीज होत असतात. या आठवड्यातही प्रेक्षकांना अनेक मोस्टवेटेड चित्रपट आणि वेबसीरीज पाहायला मिळणार आहेत. Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar, Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही आवडत्या कलाकृती पाहू शकता. ८ जुलै ते १४ जुलै या दिवसांत प्रेक्षकांना ओटीटीवर कॉमेडी, ॲक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट पाहायला मिळणार आहे.

Commander Karan Saxena Poster

Commander Karan Saxena- Disney + Hotstar

पाकिस्तानचा एक कट उधळवून टाकण्याच्या तयारीत असलेल्या 'कमांडर करण सक्सेना' यांची गोष्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या सीरीजच्या माध्यमातून 'महाराष्ट्राची क्रश' हृता दुर्गुळेने ओटीटी क्षेत्रात डेब्यू केलं आहे. हृतासोबत या सीरिजमध्ये अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.८ जुलैला ही वेब सीरिज Disney + Hotstar वर प्रदर्शित झाली आहे.

Showtime S2 Poster

Showtime S2- Disney + Hotstar

शोबिज जगातील काळी बाजू या वेब सीरिजमध्ये दाखवली आहे. सीरिजमध्ये नेपोटिझम आणि सिनेइंडस्ट्रीमधील घाणेरडं राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे. पहिल्या सीझनला अफलातून प्रतिसाद मिळाल्यानंतर या सीरीजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत, इम्रान हाश्मी, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, नसिरुद्दीन शहा, श्रिया सरन आहेत. ही सीरीज १२ जुलैला Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.

Pill Poster

Pill- Jio Cinema

मेडिकल क्षेत्रात चालणारा औषधांचा काळाबाजार आणि भ्रष्टाचाराची झलक या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. चांगलं विरुद्ध वाईट कथा या वेबसीरिजतून बघायला मिळेल. PILL सीरिजची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या RSVP Movies ने केली आहे. तर राज कुमार गुप्ता यांनी वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. JioCinema Premium वर १२ जुलै रोजी PILL वेबसीरीज रिलीज होणार आहे. सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत, रितेश देशमुख दिसणार आहे.

36 Days Poster

36 Days- Sony Liv

'36 Days' या थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिकेत नेहा शर्मा दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक रहस्यमय असून या हॉररपटाची स्टोरी खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे. '36 Days'मध्ये मुख्य भूमिकेत नेहा शर्मासोबत पूरब कोहली, श्रुती सेठ, शारिब हाश्मी, अमृता खानविलकर आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार आहेत. ही सीरीज Sony Liv या ओटीटीवर १२ जुलैला रिलीज होणार आहे.

Wild Wild Punjab Poster

Wild Wild Punjab- Netflix

'वाईल्ड वाईल्ड पंजाब' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. या धमाल मस्ती आणि कॉमेडीपटात मुख्य भूमिकेत, इशिता राज, पत्रलेखा, सनी सिंग, वरुण शर्मा, मनजोत सिंग, जस्सी गिल आणि राज हुंदल आहेत. सिमरप्रीत सिंगने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर लव रंजन आणि अंकुर गर्गने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चार मित्रांची कथा असून ट्रीपला गेल्यानंतरची धम्माल मस्ती तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट 10 जुलै रोजी Netflixवर प्रदर्शित होणार आहे.

Maharaja Poster

Maharaja- Netflix

निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित 'महाराजा' तमिळ ॲक्शन थ्रिलर चित्रपट आता थिएटरनंतर ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय सेथुपतीच्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. चित्रपटामध्ये, विजय सेतुपतीने प्रमुख भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत आहे. त्याचा हा ५० वा चित्रपट आहे. 'महाराजा' १२ जुलै २०२४ रोजी Netflixवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत पाहायला मिळेल.

Kakuda Poster

Kakuda- Zee5

सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम आणि रितेश देशमुख स्टारर 'ककूडा' चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेय. अनेक वर्षांपासून या गावाला शाप लागला आहे. दर मंगळवारी सायंकाळी ७.१५ वा. प्रत्येकाला आपल्या घराचा छोटा दरवाजा उघडा ठेवावा लागतो. तसे न केल्यास त्या घरातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो. हा हॉरर, कॉमेडीपट १२ जुलै रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT