A R Rahman  Saam tv
मनोरंजन बातम्या

AR Rahman: संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

AR Rahman Admitted to Apollo Hospital: संगीतकार ए. आर रहमानची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एआर रहमान यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच त्यांचे चाहते चिंतेत आले आहेत.

Priya More

ऑस्कर विनर संगीतकार ए.आर. रहमान यांची प्रकृती खालवली. त्यांना चेन्नईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ए. आर. रहमान यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्यांना चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

संगीतकार ए.आर. रहमान यांना डिहायड्रेशनचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. ए.आर. रहमान शनिवारी लंडनवरून मायदेशी परतले. त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून ते शनिवारी रात्री तपासणीसाठी रुग्णालयात गेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ए आर रहमान हे रमजानचे उपवास करत असल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा.

तर दुसरीकडे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ए.आर. रहमान यांच्या छातीत अचानक दुखू लागले. या तक्रारीनंतर रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आवश्यक चाचण्या केल्या आहेत. ज्यामध्ये ईसीजी आणि इकोकार्डियोग्रामचा समावेश होता. त्यांची अँजिओग्राफी देखील करता येईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही ७ गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT