AR Rahman Concert Saam tv
मनोरंजन बातम्या

AR Rahman Concert: हसत हसत गेले पण निराश होऊन परतले, ए आर रहमान यांच्या चेन्नईमधील कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

AR Rahman Fan Angry After Concert: सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या कॉन्सर्टला उपस्थिती लावलेल्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Priya More

Chennai AR Rahman Concert:

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान (Oscar winning composer AR Rahman) यांची कॉन्सर्ट म्हटलं की, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होत असते. कॉन्सर्टची तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांची चढाओढ सुरु असते. ए आर रहमान यांच्या कॉन्सर्टच्या (AR Rahman Concert) तिकीटासाठी अनेकदा चाहते वाढीव पैसे देखील देतात.

अशामध्ये चेन्नईमध्ये (Chennai) ए आर रहमान यांच्या कॉन्सर्टसाठी गेलेल्या चाहत्यांची निराशा झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या कॉन्सर्टला उपस्थिती लावलेल्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चेन्नईमध्ये ए आर रहमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे १० सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टसाठी ए आर रहमानचे चाहते खूपच उत्सुकतेने आणि हसत हसत गेले पण ते निराश होऊन घरी परतले. या लाईव्ह कॉन्सर्टबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ए.आर. रहमानच्या चाहत्यांनी कॉन्सर्ट व्यवस्थापनावर निशाणा साधत कॉन्सर्टचा व्यवस्थित आनंद घेता आला नसल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे.

एआर रहमान यांच्या चेन्नईतील कॉन्सर्टची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. मात्र, जेव्हा कॉन्सर्ट झाली तेव्हा चाहत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कॉन्सर्टला उपस्थिती लावलेल्या प्रेक्षकांनी सांगितले की, 'त्यांना तेथे भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांना तर या ठिकाणी कॉन्सर्टला प्रवेश मिळाला नाही. या सर्व गोष्टींसाठी या कॉन्सर्टचे आयोजक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या सोशल मीडियावर ते संताप व्यक्त करत असून याचीच चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

SCROLL FOR NEXT