Oscar Winner hollywood editor Marcia Lucas Passes Away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Famous Artist Death: ऑस्कर विजेती कलाकार वयाच्या ८० व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. स्टार वॉर्स आणि अमेरिकन ग्राफिटी यांसारख्या 'कल्ट क्लासिक' चित्रपटांमधील त्यांनी अप्रतिम काम केले.

Shruti Vilas Kadam

Famous Artist Death: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘स्टार वॉर्स’ या जगप्रसिद्ध चित्रपटाच्या एडिटर आणि ऑस्कर विजेत्या मार्शिया लुकास यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून, हॉलिवूडने एक उत्तम एडिटर, कथाकार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावल्या आहेत.

मार्शिया लुकास या केवळ एक उत्कृष्ट एडिटर नव्हत्या, तर त्यांनी चित्रपट एडिटिंगच्या माध्यमातून अनेक कालातीत चित्रपटांना नवी ओळख मिळवून दिली. पडद्यामागे राहूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. विशेषतः ‘स्टार वॉर्स’ मालिकेच्या यशामध्ये त्यांच्या एडिटिंग कौशल्याचा मोठा वाटा मानला जातो.

कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या मार्शिया यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपट एडिटर म्हणून केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रसिद्ध एडिटर वेर्ना फील्ड्स यांच्यासोबत काम केले. याच काळात त्यांची भेट दिग्दर्शक जॉर्ज लुकास यांच्याशी झाली. दोघांनी १९६९ मध्ये लग्न केले आणि पुढे अनेक चित्रपटांवर एकत्र काम केले.

जॉर्ज लुकास यांच्या ‘THX 1138’ या चित्रपटात सहाय्यक एडिटर म्हणून काम करताना त्यांनी आपली कला दाखवली. त्यानंतर ‘अमेरिकन ग्राफिटी’ या चित्रपटाच्या एडिटिंगसाठी त्यांना १९७४ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट एडिटर’ म्हणून ऑस्कर नामांकन मिळाले. जरी त्यावेळी पुरस्कार हुकला असला, तरी त्यांची दखल संपूर्ण हॉलिवूडने घेतली होती.

मार्शिया यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश ‘स्टार वॉर्स’ ठरले. पॉल हिर्श आणि रिचर्ड च्यू यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाचे एडिटिंग केले आणि ‘सर्वोत्कृष्ट एडिटर’ हा ऑस्कर पुरस्कार पटकावला. ‘स्टार वॉर्स’ने त्या वर्षी एकूण सहा ऑस्कर जिंकले आणि त्याच्या यशामागे मार्शिया यांच्या एडिटिंग कौशल्याचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने हॉलिवूडमधील एका सुवर्णयुगाचा महत्त्वाचा अध्याय संपला असला, तरी त्यांनी निर्माण केलेला वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT