Bhau Kadam Interview Saam TV
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam - Raj Thackeray: 'करून गेलो गाव'च्या 100 व्या प्रयोगनिमित्त भाऊ कदमने राज ठाकरे यांचे नाव घेत व्यक्त केली इच्छा

Bhau Kadam Natak: 'करून गेलो गाव' नाटकाचा १०० वा प्रयोग आहे.

Pooja Dange

Raj Thackeray Attend Karun Gelo Gav Prayog:

भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचं नाटक 'करून गेलो गाव' सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा आज १०० वा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाला मनसे नेते राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

भाऊ कदम यांचे हे नाटक २०११ साली प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता १० वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक रंगमंचावर आले आहे. या नाटकात तिचं धमाल आणि तोच उत्साह पाहायला मिळत असल्याचे भाऊ कदम यांनी सांगितलं आहे.

'करून गेलो गाव' या नाटकाविषयी बोलताना भाऊ कदम म्हणले की, 'दहा वर्षांपूर्वी 'करून गेलो गाव' हे नाटक केले होतं. आता दहा वर्षांनी नवीन टीमसोबत हे नाटक करत आहे. जुने काही कलाकार आणि काही नवीन कलाकार अशी आमची टीम मिळून आम्ही खूप छान काम करतोय. पहिल्यापेक्षा खूप धमाल येतेय. प्रेक्षकांना देखील नाक खूप आवडतंय याचा खूप आनंद होतोय.'

'करून गेलो गाव'मध्ये काय पाहायला मिळेल?

सामला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना नाटक पाहायला येण्याचे आवाहन दिले आहे. 'नाटक पाहायला आल्यावर तुम्हाला कोकणातील समस्या लक्षात येतील. या समस्या दूर झाल्या पाहिजेत जेणेकरून कोकण अजून समृद्ध व्हायला मदत होईल.' असं मत भाऊ कदम यांनी मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे नाटक पाहायला येणार?

'वस्त्रहरण' नाटक जेव्हा आला होत तेव्हा ते पु.ल. देशपांडे यांनी पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी एक पात्र लिहिलं होत 'हे नाटक नक्की बघा'. त्यानंतर वस्त्रहरण नाटक धो-धो चाललं होत. तसेच राज ठाकरे आज येतील त्यांनी नाटक पाहिल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करावं, नाटकाविषयी बोलावं. त्यामुळे आमचं नाटक धो-धो चालेल अशी इच्छा आहे.' असे म्हणत भाऊ कदम यांनी राज ठाकरे यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली आहे.

राज ठाकरेंविषयी काय म्हणले भाऊ कदम?

'राज ठाकरे एक कलाकार आहेत. ते कलाकारांची कदर करतात. त्यांना प्रेम आहे कलाकारांविषयी. त्यांच्यासमोर नाटक सादर करताना खूप आनंद होतोय. त्यांनी संपूर्ण नाटक पाहिलं तर खूप खूप आनंद होईल. त्यांनी पूर्ण नाटक पाहावं अशी सर्व कलाकारांची इच्छा आहे.' राज ठाकरे नाटक पाहायला येणार असल्याचा आनंद भाऊ कदम यांनी त्यांच्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT