Rishi Kapoor Third Death Anniversary: दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा आज तिसरा स्मृती दिन आहे. ऋषी कपूर यांनी हिट चित्रपटातून पदार्पण केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते. त्यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्री सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत. ऋषी कपूर दिलखुलासपणे आयुष्य जगणारा माणूस म्हणून कायम स्मरणात राहील.
चित्रपटसृष्टीत त्यांना 'चिंटू' या नावाने ओळखले जायचे, त्यांच्या 50 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी जवळपास 121 चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खानच्या आधी त्यांना बॉलिवूडचा रोमँटिक बॉय म्हटले जायचे.
ऋषी कपूर यांनी 1972 ते 2000 दरम्यान 92 रोमँटिक चित्रपट केले. 2008 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शेवटच्या काळात ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता, त्यांची प्रकृती सतत खालावत होती. 29 एप्रिल रोजी अभिनेता इरफान खानच्या निधनाने इंडस्ट्री शोकाकुळ झाली होती, तिथे 24 तासांनंतर 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांनीही या जगाचा निरोप घेतला. या दोन मोठ्या दिग्गजांच्या निधनाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला. ऋषी कपूर यांना फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये यश मिळवले होते, त्याच दरम्यान त्यांना लहान वयात काही वाईट सवयी देखील लागल्या होत्या. असे म्हटले जाते की शालेय जीवनात ऋषी यांना सिगारेट ओढण्याची सावरू लागली होती. त्यांच्या शाळेबाहेर असलेल्या कोका-कोला स्टँडवर सिगारेट मिसळत असे. ऋषी तिथून सिगारेट घेऊन ओढत असत
दुकानदाराचे ऋषी कपूर यांची त्या दुकानदाराकडे ३०० रुपयांची उधारी झाली होती, जे ते फेडू शकले नाहीत. त्यावेळी दुकानदाराने त्यांना धमकी द्यायला सुरूवात केली की, जर त्याने उधारीचे पैसे दिले नाहीत तर तो राज कपूरला जाऊन सांगेन. परंतु असे काहीही झाले नाही आणि जेव्हा ऋषी स्टार झाले तेव्हा त्यांनी अहमदला मिठी मारली, पण त्याने पैसे मागितले नाहीत.
शोमन राज कपूर आणि कृष्णा यांच्या घरी ऋषी कपूर यांचा जन्म झाला. ऋषी लहान असताना आजोबा पृथ्वीराज कपूर आणि वडील राज कपूर यांच्यासोबत चित्रपटांचे शूटिंग पाहण्यासाठी सेटवर जात असत. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ऋषीचा पहिला चित्रपट 'श्री 420' होता, ज्यामध्ये त्यांची छोटीशी भूमिका होती. (Latest Entertainment news)
या चित्रपटातील एका गाण्यात ऋषी यांना त्यांच्या भावंडांसोबत पावसात भिजत रस्ता ओलांडायचा होता, पण ऋषी कपूर रडू लागले. 'श्री 420' च्या नायिका नर्गिस यांनी ऋषी यांना चॉकलेटचे आमिष दाखवून शॉट पूर्ण करून घेतला.
एके दिवशी मेक-अप मॅनकडून सिगारेट घेऊन ऋषी तो ओढत होते, त्यांना त्यांच्या वडिलांनी रंगे हात पकडले. ऋषींना इतका मारलं की त्यांनी पुन्हा सिगारेटही ओढली नाही.
ऋषी कपूर यांचे मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूरशी खूप घनिष्ट संबंध होते. कोरोना व्हायरसच्या संकटात ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मुलगा रणबीरने एका जबाबदार मुलाप्रमाणे सर्व विधी पूर्ण केल्या. आजही रणबीर कपूर अनेकदा वडिलांच्या आठवणीत भावूक होताना दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.