OMG-2 चे पोस्टर रिलीज; अक्षय कुमार 'महादेव'च्या भुमिकेत Saam TV
मनोरंजन बातम्या

OMG-2 चे पोस्टर रिलीज; अक्षय कुमार 'महादेव'च्या भुमिकेत

2012 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओह माय गॉड' या (OMG 2) चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे.

वृत्तसंस्था

2012 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओह माय गॉड' या (OMG 2) चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे, ज्याचे नाव 'ओह माय गॉड 2' असणार आहे. प्रेक्षक आता या चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. तर त्याचवेळी अक्षय कुमारने देखील या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. अक्षयने रिलीज केलेले पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. OMG 2 मध्ये अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये भगवान भक्ताचा हात धरलेला दिसत आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्वतः महादेवाच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमार चाहत्यांना चित्रपटाचे पोस्टर चांगलेच आवडले आहे.

ही पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कर्ता करे ना कर सके शिवा करे सो हो. OMG 2 साठी तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना आवश्यक आहेत, एक सामाजिक प्रश्न मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आदियोगी आम्हाला या प्रवासासाठी आशीर्वाद देईल. सगळीकडे शिव आहे. ' अक्षय कुमारने चित्रपटातील सहकलाकार पंकज त्रिपाठीसोबत उज्जैनमधील महाकाल शहरात बाबा महाकालचे दर्शन घेतले. त्यानंतरच त्याने त्याच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.

'ओह माय गॉड 2' चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल 17 दिवसांसाठी उज्जैनमध्ये ठेवण्यात आले आहे. या चित्रपटातील काही दृश्ये अक्षय कुमारसोबत महाकाल मंदिरात शूट करण्यात येणार आहेत. चित्रपटाचे उर्वरित शूटिंग इंदूरमध्येही होणार आहे. अक्षय कुमारशिवाय पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी 2012 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमार भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्याचवेळी त्यांच्यासोबत परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT