OMG 2 Controversy
OMG 2 Controversy  You Tube
मनोरंजन बातम्या

OMG 2 Controversy : सेन्सॉर बोर्डाने हिरवा झेंडा दाखवूनही 'OMG 2'च्या विरोधात वातावरण तापलं; उज्जैनमध्ये थेट चित्रपटावर बंदी

Pooja Dange

OMG 2 Movie Banned In Ujjain :

'ओ माय गॉड 2' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. असे असताना आता चित्रपटावरून नवा वाद सुरु झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान शंकर कचोरी विकत घेताना दाखविले आहेत.

श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी आणि अखिल भारतीय पुजारी महासंघाचे पंडित महेश शर्मा यांनी या चित्रपटात भगवान शंकराचे अशा प्रकारे सादरीकरण केल्यामुळे आक्षेप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी चित्रपटाचा निर्माता, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि चित्रपट अभिनेत्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. हा चित्रपट उज्जैनमध्ये प्रदर्शित करण्यास विरोध करण्यात आला आहे.

या चित्रपटाबाबत कायदेशीर नोटीस बजावणारे श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी पंडित महेश शर्मा म्हणाले की, प्रार्थनास्थळांवर चित्रपट बनवणे ही चांगली गोष्ट आहे. पण चित्रपटात देवाला कोणत्याही रूपात सादर करू नये.

या प्रकारच्या सादरीकरणामुळे धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या श्रद्धा दुखावू शकतात, हे चित्रपट निर्मात्यांनी लक्षात ठेवावे. चित्रपटात भगवान शंकर कचोरी विकत घेताना दाखवण्यात आले असून यामुळे आमच्या श्रद्धेला धक्का बसला आहे.

आम्ही उच्च न्यायालयाचे वकील अभिलाष व्यास यांच्यामार्फत चित्रपट दिग्दर्शक अमित राय, निर्माता विपुल शाह, चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेता अक्षय कुमार तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Latest Entertainment News)

मनोरंजनासाठी बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटात आमच्या आवडत्या भगवान शंकराची चेष्टा करू नये, एवढीच आमची इच्छा आहे. चित्रपट निर्मात्याने महाकाल मंदिरात चित्रित केलेली दृश्ये चित्रपटातून काढून टाकावीत आणि २४ तासांत आमची जाहीर माफी मागावी.

मंगळवारी सकाळी पंडित महेश शर्माही उज्जैन जिल्ह्यात चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. हा चित्रपट उज्जैन जिल्ह्यात प्रदर्शित करू नये, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी केला आहे. अर्जात असेही म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम हा चित्रपट उज्जैन जिल्ह्यात प्रदर्शित शकत नाहीत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका ठिकाणी अभिनेता अक्षय कुमार म्हणतो 'रख विश्वास तू है शिव का दास.' तर दुसऱ्या दृश्यात कचोरीवाला त्याचा आशीर्वाद घेण्यास नकार देतो. चित्रपटामध्ये असे दाखविणे चुकीचे आहे. भगवान शंकराचे जगभरात करोडो भक्त आहेत. ज्यांची शंकरावर नितांत श्रद्धा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

Delhi Politics: निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परताच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Mulund BJP | बघतोच आता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना थेट इशारा

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

SCROLL FOR NEXT