Nora Fatehi Los Angeles Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi : लॉस एंजेलिसमध्ये नोरा फतेही अडकली, प्रचंड घाबरत अग्नितांडवाचा व्हिडीओ केला पोस्ट

Nora Fatehi Los Angeles : मंगळवारी लागलेल्या वणव्यामुळे नोरा फतेहीने आणि तिच्या टीमने लॉस एंजेलिसमधील अडकले होते. तेथील परिस्थीतीचे वर्णन करणारी नोराची पोस्ट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Nora Fatehi : बुधवारी अमेरिकेत लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही आग निवासी भागात पोहोचली असून, अनेक प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचे आणि आलिशान बंगल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घडामोडींमध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीने तिचा अनुभव शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नोरा फतेहीने सांगितले ती आगीत कशी अडकली

नोरा फतेहीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये सांगितले की, या भीषण आगीमुळे ती लॉस एंजेलिसमध्ये अडकली होती, पण आता ती तिथे सुरक्षित आहे. एका व्हिडिओद्वारे तिची परिस्थिती आणि भीती उघड करताना नोरा म्हणाली की आग इतक्या वेगाने पसरत होती की त्यांना ताबडतोब ते ठिकाण सोडावे लागले आणि सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे.

नोराचा अनुभव

इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करताना नोरा म्हणाली, “मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलातील आग वेगाने पसरत आहे. मी असे दृश्य कधीच पाहिले नाही. आग इतक्या वेगाने पसरत आहे की आम्हाला आमचे राहते हॉटेल रिकामे करण्याचा आदेश फक्त ५ मिनिटांपूर्वी मिळाला होता. म्हणून, मी ताबडतोब माझे सामान पॅक केले आणि हा परिसर सोडण्याचा निर्णय घेतला. आता, मी विमानतळावर जात आहे, जिथे मी फ्लाइटची वाट पाहेन.”

आगीचे परिणाम

या घटनेमुळे लॉस एंजेलिसमधील अनेक भाग प्रभावित झाले आहेत, ज्यामध्ये महागड्या आणि प्रसिद्ध कलाकारांच्या घरांचे नुकसान झाले आहे. नोराचा व्हिडीओ शहरात राहणाऱ्या लोकांसाठी आणि सेलिब्रिटींसाठी निर्माण झालेल्या संकटाचे प्रतिबिंबित करतो. नोराच्या मते, ती आता सुरक्षित आहे, परंतु आगीच्या गंभीर परिस्थितीमुळे तिची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT