NMACC Events Silver Plates Saam Tv
मनोरंजन बातम्या

NMACC Event: नीता अंबानींच्या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला 'चांदीचे ताट', काय होता मेनू एकदा बघाच!

Nita Mukesh Ambani: नीता अंबानींच्या या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे चांदीच्या ताटाने. हे चांदीचे ताट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nita Mukesh Ambani Cultural Centre: मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Center) शुक्रवारी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची अजूनही चर्चा होत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहेत. नीता अंबानींच्या या कार्यक्रमात भारताची संस्कृती सविस्तरपणे मांडण्यात आली होती. कार्यक्रमातील प्रत्येक गोष्ट खूपच खास होती. पण या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे चांदीच्या ताटाने. हे चांदीचे ताट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

नीता अंबानींच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली होती. अंबानी कुटुंबाचा कोणताही कार्यक्रम असला तर त्यामध्ये जेवणाची चंगळ असते याबद्दल तर सांगला नको. नीता अंबानींच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी तर चक्क चांदीच्या ताटामध्ये वेगवेगळ्या भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना मोठ्या चांदीच्या ताटामध्ये जेवण देण्यात आले होते. या चांदीच्या ताटाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे स्वादिष्ट जेवणाचे ताट पाहून सर्व पाहुण्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहले नसेल. कारण हे जेवणाचे ताट खूपच अप्रतिम दिसत होते मग त्यामधील जेवण देखील तितके स्वादिष्ट असेल यात शंका नाही.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने या रॉयल सिल्व्हर प्लेटचा फोटो आपाल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या कार्यक्रमात श्रद्धा कपूर जबरदस्त ड्रेसिंगमध्ये दाखल झाली होती. तिने या कार्यक्रमात डान्स देखील केला. श्रद्धाने तिचे हे सर्व फोटो शेअर करत अंबानी कुटुंबाने चांदीच्या ताटामध्ये दिलेल्या जेवणाचा फोटो देखील शेअर केला. या चांदीच्या ताटात अनेक पदार्थ पाहायला मिळत आहेत.

या चांदीच्या ताटामध्ये मेनू काय असेल? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर या ताटामध्ये दिसत असलेल्या पदार्थांमध्ये दाल मखनी, पालक पनीर, शाही पनीर, पापड, लाडू, पराठा, रोटी यासह अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात नऊ प्रकारच्या डाळी होत्या. त्याचसोबत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे पदार्थ मेनूमध्ये ठेवण्यात आले होते.

Edited By - Priya Vijay More.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर तानाजी मुटकुळेंच्या दाव्याने खळबळ, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT