Nivedita Saraf SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nivedita Saraf : "मी भाजपाची कट्टर फॅन..."; बिहारच्या निकालानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत

Nivedita Saraf Talk On BJP : निवेदिता सराफ यांना नुकताच 'गंधार गौरव पुरस्कार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा त्यांनी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीवर आपले मत मांडले आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घेऊयात.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

निवेदिता सराफ यांना 'गंधार गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निवेदिता सराफ यांना अशोक सराफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

निवेदिता सराफ यांनी भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

निवेदिता अशोक सराफ (Nivedita Saraf ) यांना 'गंधार गौरव पुरस्कार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालदिनाचे औचित्य साधून ( 14 नोव्हेंबर 2015) रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील त्यांच्या योगदानासाठी दिला गेला आहे.

निवेदिता सराफ यांना त्यांच्या नवऱ्याला (अशोक सराफ) हस्ते पुरस्करा मिळाल्यामुळे त्या खूपच खुश होत्या. पुरस्कार स्वीकारल्यावर त्या म्हणाल्या, "आज मी जे काही आहे ते माझे गुरु , पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला,याचा मला विशेष आनंद आहे. " सध्या निवेदिता सराफ आणि अशोक सराफ कलर्स मराठी या वाहिनीवरील 'अशोक मा.मा' या मालिकेत एकत्र झळकत आहे. त्यांच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं आहे. बिहार विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहारमधील निकालानंतर अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. समारंभात निवेदिता सराफ म्हणाल्या की, "आमदार संजय केळकर यांचे बिहारमध्ये झालेल्या विजयासाठी अभिनंदन! मी कट्टर बीजेपी (भाजप) समर्थक असल्याने मला खूप आनंद झाला आहे."

निवेदिता सराफ आपल्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल म्हणाल्या की, "माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरूवात बाल रंगभूमीपासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरु. त्यांच्या संस्थेत अनेक बाल नाट्य केलं. सुधाताई यांनी मला स्टेजवर उभे राहायला शिकवले. त्या काळात रत्नाकर मतकरी ,सुधाताई हे सातत्याने बालनाट्य करत होते.

महाराष्ट्रभर दौरे करायचे. बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे. बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले प्रेक्षक बनतात. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे. माझी वाटचाल बाल रंगभूमीपासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असे वाटत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : चांदी ₹३५००० वाढली, तर सोनं प्रति तोळा ₹३३२० नं महागलं, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

Valentine Day 2026 : लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' होईल खूपच खास, वाचा 'या' ५ रोमँटिक आयडिया

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भंयकर अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT