Nilu Phule Saam Tv
मनोरंजन बातम्या

निळू फुलेंवर येणार चित्रपट! प्रसाद ओक करणार दिग्दर्शन

निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने एका प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने त्यांच्यावर चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे.

श्रेयस सावंत

श्रेयश सावंत

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील खलनायक म्हणून दिवंगत अभिनेते निळू फुले यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून उत्तम खलनायक (Villain) साकारला आहे. त्या निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने एका प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) त्यांच्यावर चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे.

सध्या चंद्रमुखी या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने आपल्या सोशल मीडियावर (Social Media) या संदर्भात माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केलेल्या फोटोत प्रसाद ओकने लिहिले,

निळूभाऊ...
आज तुमचा वाढदिवस...!!!
तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं...अनुभवता आलं... तुमच्याकडून बरंच काही शिकलो... तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन "गुरु" च मानलं...
तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल...!!!
फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ...!!!

प्रसाद ओक निळू फुलेंवर चित्रपट करणार असल्याने निळू फुले यांचे चाहते मात्र जाम खुश झाले आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टखाली चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचे शूटींग कधी सुरू होईल याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT