Famous Actor Tony Germano Passes Away Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचा घराच्या छतावरून पडून मृत्यू; मनोरंजन विश्वात शोककळा

Famous Actor Death: ब्राझीलचे 55 वर्षीय नेटफ्लिक्स स्टार आणि व्हॉइस-कलाकार टोनी जर्मानो यांचे छत दुरुस्त करताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Death: सुप्रसिद्ध अभिनेता आणि व्हॉइस-कलाकार टोनी जर्मानो यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या ब्राझील येथील साओ पावलो येथील घराच्या छताची दुरुस्ती करत असताना ते तोल जाऊन खाली पडले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “हा अतिशय दु:खद प्रसंग असून, आमच्या प्रिय मित्राच्या निधनाची माहिती देताना आम्हाला अत्यंत वेदना होत आहेत.”

टोनी जर्मानो यांनी अभिनयासोबतच व्हॉइस-आर्टिस्ट म्हणूनही भक्कम ओळख निर्माण केली होती. नेटफ्लिक्स, निकेलोडियन, डिस्ने यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी अनेक लोकप्रिय प्रकल्पांना आवाज दिला. त्यात 'गो डॉग गो!', 'निकी, रिकी, डिकी आणि डॉन' यांसारख्या चर्चित शोचा समावेश आहे.

याशिवाय रंगभूमीवरही त्यांचे अत्यंत यशस्वी करिअर होते. त्यांनी 'द फँटम ऑफ द ऑपेरा', 'मिस सायगॉन', 'जेकिल अँड हाइड' यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध नाटकांत काम केले होते. अलीकडच्या काळात त्यांनी 2025 मधील ‘Labyrinth of Lost Boys’ आणि 2023 मधील ‘An Unforgettable Year: Autumn’ या चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या.

त्यांच्या अचानक निधनाने सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना “प्रतिभावान, मनमिळाऊ आणि अविस्मरणीय कलाकार” म्हणून श्रद्धांजली वाहिली आहे. मनोरंजन विश्वासाठी हा मोठा धक्का आहे. टोनी जर्मानो यांच्या आवाजातील जादू आणि त्यांच्या अभिनयाची उंची प्रेक्षकांच्या मनात कायम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी यवतमाळमध्ये दगडफेक

Maharashtra : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पोलिसांची मोठी कामगिरी; ८९ लाख बक्षीस असलेले ११ नक्षलवादी सरेंडर

Skin Care: ड्रायनेसमुळे चेहरा डल पडलाय? मग 'या' फळाच्या घरगुती फेसपॅकने मिळेल नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्टो स्किन

Idli Manchurian: उरलेल्या इडल्या फेकून देताय? करा कुरकुरीत शेजवान इडली मंचुरियन, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Kala Vatana Rassa Bhaji Recipe: मालवणी स्टाईल काळ्या वटाण्याची रस्सा भाजी घरी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT