Money Heist Saam Tv
मनोरंजन बातम्या

Netflix New Web Series: 'बेला चाओ' गाण्याने खिळवून ठेवणाऱ्या ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरीजमधील 'बर्लिन' येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नेटफ्लिक्सवरील वेबसीरीज (Web Series) म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. एका भाग संपला की प्रेक्षक दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत असतात. ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) या वेबसीरीजची कथा अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मूळ स्पॅनिशमध्ये असलेल्या या वेबसीरीजने संपूर्ण जगाला वेड लावले होते. ‘मनी हाईस्ट’चे आतापर्यंत ५ भाग प्रदर्शित झाले आहते.

अत्यंत हुशार प्रोफेसर ८ लोकांनासह चोरी करण्याची मोठी योजना आखतो. ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरीजच्या कथेने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे. यातील प्रत्येक पात्राची वेगळी गोष्ट आहे. त्या गोष्टींसह ती पात्र चोरीच्या प्लॉनमध्ये सहभागी होतात. या सर्व पात्रांना जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. जगातील प्रसिद्ध शहरांची नावे या पात्रांना देण्यात आली आहेत आणि हे वेगळेपण प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

या वेबसीरीजमधील एक लोकप्रिय पात्र म्हणजे बर्लिन (Berlin). या पात्राची कथा पहिल्या चोरीनंतर संपली होती. प्रेक्षकांच्या बर्लिनवरील प्रेमापोटी निर्मात्यांनी त्याला पुढील भागातही एका वेगळ्या पद्धतीने वेबसीरीजमध्ये समाविष्ट केले. बर्लिनचे बोलणे, त्याची देहबोली, समोरच्याला मोहित करणारे व्यक्तिमत्व आणि त्याचे या सीरीजमधील महत्व यामुळे बर्लिन प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.

पाचवा सीझन संपल्यानंतरही 'बर्लिन' पुन्हा वेबसीरीजमध्ये दिसेल अशी चर्चा सुरू होती. बऱ्याच फॅन्सना बर्लिनचा शेवट मान्य नव्हता. ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांना नेटफ्लिक्सने (Netflix) आनंदाची बातमी दिली आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. बर्लिनवर एक स्वतंत्र स्पिन ऑफ (Spin Off) सीरीज येणार असल्याची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. नेटफ्लिक्सने बर्लिनचा एक छोटा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे. ही वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार हे अजून नेटफ्लिक्सकडुन सांगण्यात आलेले नाही. बर्लिन आता प्रेक्षांवर कोणती नवीन जादू करणार हे पुन्हा या वेबसीरीजच्या माध्यमातून दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Weight Loss Tea : नेहमीचा चहा करताना घाला या ३ गोष्टी फक्कड होईल चहा पोटही होईल कमी

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

Karjat Station Accident : पती दिसला नाही म्हणून महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Rautwadi Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतोय 'राऊतवाडी धबधबा', निसर्ग सौंदर्यात हरवून जाल

SCROLL FOR NEXT