Sana Makbul Boyfriend Srikanth Bureddy Announce Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sana Makbul Wedding : ‘बिग बॉस ओटीटी ३’ची ट्रॉफी जिंकताच सना मकबूल करणार लग्न; अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने सांगून टाकलं, निमंत्रणही दिलं

Sana Makbul Boyfriend Srikanth Bureddy Announce Wedding : ग्रँड फिनालेला, सनाच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती लावली होती. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे सनाच्या बॉयफ्रेंडने...

Chetan Bodke

बहुचर्चित ‘बिग बॉस ओटीटी ३’ला अखेर विजेता मिळालेला आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये होस्ट अनिल कपूर यांनी शोची विजेती म्हणून सना मकबूलच्या नावाची घोषणा केली. तर रॅपर नेजीची रनर-अप म्हणून घोषणा केली. तर रणवीर शौरीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. सध्या सना मकबूलवर फॅमिलीसोबतच चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ग्रँड फिनालेला, सनाच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती लावली होती. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे सनाच्या बॉयफ्रेंडने...

सना मकबूलच्या बॉयफ्रेंडचं नाव श्रीकांत बुरेड्डी आहे. सना ‘बिग बॉस ओटीटी ३’ची विजेती झाल्यानंतर श्रीकांतने माध्यमांसमोर लग्नाची घोषणा केली आहे. यावेळी श्रीकांतने सनाचं तोंडभरून कौतुक केले आहे. माध्यमांसोबत संवाद साधताना श्रीकांत बुरेड्डी म्हणाला, "तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. सना बिग बॉसच्या घरात खूप चांगल्या पद्धतीने खेळली." यावेळी माध्यमांनी श्रीकांतला तू सनासोबत केव्हा लग्न करणार ? असा प्रश्न विचारला.

श्रीकांत म्हणाला, "होय, आम्ही लवकरच लग्नगाठ बांधणार आहोत. येत्या काही महिन्यांत आम्ही लग्नबंधनात अडकू. उशीर होईल, पण नक्की लग्न होईल. आम्ही लग्नाला तुम्हाला सर्वांना आवर्जून बोलवू." ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ग्रँड फिनालेवेळी श्रीकांत बुरेड्डी उपस्थित होता. श्रीकांतने सनासोबत ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या स्टेजवरील एक सेल्फी शेअर केला. श्रीकांत बुरेड्डी पेशाने उद्योजक आहे. श्रीकांत बुरेड्डी ‘बडीलोन’ कंपनीचा मालक असून त्याची कंपनी पर्सनल लोन देते. तर सना त्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसडर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT