Falguni Pathak Neha Kakkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

'ओ सजना' या नवीन गाण्यामुळं नेहा कक्कर वादाच्या भोवऱ्यात

नुकताच नेहा कक्करचं ओ सजना हे गाणे रिलीज झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर नवीन गाणं सादर करत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'तुमको बारिश पासंद है' सुपरहिट गाण्यानंतर आता नेहाचं 'ओ सजना' गाणं रिलीज झाले आहे. 'ओ सजना' या तिच्या नवीन गाण्यामुळं (Song) नेहा वादाच्या भोवऱ्यात आली आहे.

नुकताच नेहा कक्करचं ओ सजना हे गाणे रिलीज झाले आहे. नेहाने स्वता गाणे गायले असून हे गाणे फाल्गुनी पाठकच्या 90 च्या दशकातील लोकप्रिय आणि हिट गाणे 'मैने पायल है छनकाई' चे रिक्रिएशन आहे. जे फाल्गुनी पाठकचं १९९९ मध्ये रिलीज झाले होते. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये कठपुतळीचा शो दाखवण्यात आला होता. नुकताच या गाण्याचं रिक्रिएशन नेहाच्या ओ सजना या गाण्यातून झाले आहे. गाणे १९ सप्टेंबर रोजी यूट्यूबवर (Youtube) प्रदर्शित झाले. जुनी हिंदी गाणी रिक्रिएट करणाऱ्या तनिष्क बागचीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. गाण्यामध्ये नेहासोबत धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा व्हिडिओमध्ये दिसत आहेत या गाण्यावरून बराच गदारोळ सुरू आहे.

सोशल मीडियावर गाण्यावरून नेहाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. काही युजर्सने 'नेहाने जुन्या गाण्याची वाट लावली आहे' असे म्हटलं आहे. दरम्यान,अलीकडेच फाल्गुनीने एका मुलाखतीत या गाण्याबद्दल म्हणाली, की नेहा कक्कर आणि गाण्याच्या निर्मात्यांनी गाण्याच्या रिक्रिएशनबद्दल काहीही संपर्क केला नाही. परंतु या गाण्याला आजही मिळणारी पंसती पाहून मला खरंच खूप आंनद झाला आहे असे तिने म्हटलं आहे. पुढे फाल्गुनी म्हणाली, की तिला नेहावर कायदेशीर कारवाई करायची आहे, परंतु गाण्याचे हक्क तिच्याकडे नसल्यामुळे ती करू शकत नाही.

Edited By : Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

SCROLL FOR NEXT