Hardik Pandya - Natasa Stankovic | हार्दिक पंड्या आणि जॅस्मिनच्या डेटच्या चर्चांनंतर नताशानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya - Natasa Stankovic : योग्य येईल तेव्हा...; हार्दिक पंड्याच्या अफेअरच्या चर्चांनंतर नताशाच्या नव्या पोस्टनं वावटळ!

hardik pandya- jasmin walia : हार्दिक पंड्या आणि जॅस्मिन वालिया हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्तांकोविकनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळं मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात वावटळ उठली आहे.

Saam Tv

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्तांकोविक यांची पर्सनल लाइफ सध्या चर्चेत आहे. दोघांचाही संसार मोडला आहे. दोघांनी अधिकृत घोषणाही केली आहे. आता अलीकडेच हार्दिक आणि जॅस्मिन वालिया हे दोघे डेट करत असल्याची वृत्त धडकलं आणि इंटरनेट जगात चर्चेसाठी मसाला मिळाला. दुसरीकडे नताशा पोस्टवर पोस्ट करत आहे. या सगळ्या पोस्ट हार्दिक आणि तिच्या नात्याशी जोडल्या जात आहेत.

नताशाचा (natasa stankovic) विश्वासघात झाला असावा, असा अर्थ या पोस्टमधून काढला जातोय. पण हार्दिकच्या सुट्ट्यांमधील फोटो बघितल्यानंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आणि ज्यांनी तिला ट्रोल केलं, ते माफी मागू लागले.

Natasha Instagram Post | नताशानं एक व्हिडिओ पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केली आहे.

नताशाचा आता देवावरच भरवसा

घटस्फोटाच्या वृत्तानंतर नताशाने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. अलीकडेच तिने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आता देवावरच भरवसा आहे, असंच तिचं म्हणणं असावं, असा अंदाज यावरून लावला जातो. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा देव सगळं काही ठीक करेल. घाई करायला नको, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नताशाच्या व्हिडिओ पोस्टमध्ये एक कॅप्शन आहे. आपल्याकडे वेळ नाही. आपल्या हातून काही गोष्टी निसटतील असा विचार करून तु्म्ही घाई करता. पण घाईगडबडीत आपण केवळ एकच गोष्ट गमावतो आणि ती म्हणजे देवाचा आशीर्वाद. पण देव कधीही उशीर करत नाही, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हार्दिक ट्रोल, नताशाची मागितली माफी

नताशा आणि हार्दिक या दोघांनी १४ फेब्रुवारी एकमेकांसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला आणि त्याच्या तीन महिन्यांनंतर अचानक ते वेगळे होत असल्याचे वृत्त धडकले. बरेच दिवस ही चर्चा होती. अखेर १८ जुलैला ती चर्चा खरी ठरली. दोघांनी पोस्ट शेअर करून वेगळे होत असल्याचं कन्फर्म केलं.

आता काही दिवसांपूर्वी हार्दिकने व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याच ठिकाणचे फोटो गायिका आणि मॉडेल जॅस्मिन वालिया हिनंही शेअर केले. यावरून हार्दिक आणि जॅस्मिन दोघे डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

यावरून इंटरनेट विश्व भलतंच ढवळून निघालं आणि त्यांनी हार्दिकला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे काही नेटकरी ज्या नताशाला ट्रोल करत होते, त्यांनी तिची माफीही मागितली. पण हार्दिक आणि जॅस्मिन एकमेकांना खरंच डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात 'घोळ' घालत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT