Nana Patekar saam tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : "संस्कार, सत्ता, समर्पण...;" नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण; पहिल्या वेब सीरिजचा जबरदस्त टीझर आलाय | VIDEO

Nana Patekar First Web Series : हिंदी , मराठी थिएटर गाजवणारे नाना पाटेकर आता ओटीटीवर येत आहेत. त्यांच्या पहिल्या वेब सीरिजचा प्रोमो समोर आला आहे. नाना वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

Shreya Maskar

नाना पाटेकरांचे OTT वर पदार्पण झाले आहे.

नाना पाटेकरांच्या नवीन वेब सीरिजचा टीझर आला आहे.

वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हिंदी -मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर आता ओटीटी गाजवणार आहेत. त्यांची पहिली वेब सीरिज ओटीटीवर येत आहे. अलिकडेच नाना पाटेकर 'ओ रोमिओ' चित्रपटात झळकले. 'ओ रोमियो' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026ला रिलीज झाला. ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता नाना पाटेकर ओटीटीवर पदार्पण करत आहे. त्यांच्या नवीन वेब सीरिजचा टीझर समोर आला आहे.

नवीन वेब सीरिजचा टीझर

नाना पाटेकरांच्या (Nana Patekar) नवीन वेब सीरिजचा टीझर आला आहे. ज्यात नाना पाटेकर एका खास अंदाजात पाहायला मिळत आहे. नाना पाटेकरांच्या नवीन वेब सीरिजचे नाव 'संकल्प' (Sankalp) असे आहे. 'संकल्प' वेब सीरिजमध्ये सामाजिक-राजकीय थ्रिलर पाहायला मिळणार आहे. सीरिज सत्ता, भ्रष्टाचार आणि नोकरशाहीच्या यांत्रिकींवर लक्ष केंद्रित करते.

नाना पाटेकरांची भूमिका

'संकल्प' वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर 'मात साब' या भूमिकेत दिसणार आहेत. जो पंडित आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेचे ​​वर्णन आधुनिक काळातील तात्विक नेता म्हणून केले जाते, ज्याची तुलना अनेकदा समकालीन चाणक्यशी केली जाते. जो केवळ बळजबरीने नव्हे तर वैचारिक दृढनिश्चयाने कार्य करतो. प्रोमोच्या शेवटी नानांचे हिंसक रुप पाहायला मिळते. प्रोमोमध्ये नानांची संयमी आणि आक्रमक दोन्ही बाजू पाहायला मिळत आहे. ज्यामुळे वेब सीरिज अधिकच रंजक होत आहे.

'संकल्प' कुठे पाहायला मिळणार?

'संकल्प' वेब सीरिजच्या टीझरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "संस्कार, सत्ता, समर्पण...'चाणक्यनीती' में सब डाव पे लगेगा...विश्वास भी, विश्वासघात भी..." या टीझरवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव करत आहे. चाहते नाना पाटेकरांना ओटीटीवर पाहायला उत्सुक आहेत. 'संकल्प' वेब सीरिज Amazon MX Player वर मोफत पाहायला मिळणार आहे. अद्याप वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही.

कलाकार कोण?

'संकल्प' वेब सीरिजमध्ये नाना पाटेकरांसोबत मोहम्मद जीशान अयूब, कुब्रा सैत आणि संजय कपूर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रकाश झा यांनी 'संकल्प' या वेबसीरिजचं दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT