भूमिका करणं म्हणजे 'त्यांचं' समर्थन का? नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण Saam Tv
मनोरंजन बातम्या

भूमिका करणं म्हणजे 'त्यांचं' समर्थन का? नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

'गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं नाही', असं नाना पाटेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

अमोल कविटकर

पुणे : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी चित्रपटात एका भूमिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' (Why I killed Gandhi) या चित्रपटात त्यांनी नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला असून आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेवरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून आल्या. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे अमोल कोल्हेंच्या त्या भूमिकेवरून त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. 'गोडसेची भूमिका साकारणं म्हणजे त्याच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं नाही', असं नाना पाटेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल आहे.

नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हे यांची पाठराखण;

अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केलं." अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

भूमिकेबाबत अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण-

अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले 'अनेकांनी मला विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत कसं यावरती मी त्यांना सांगितलं जे मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं, “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला सारला तर मला यामध्ये सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे 'Reel लाईफ' आणि 'Real लाईफ' यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

तसंच 2017 मध्ये या सिनेमाचं (Movie) चित्रीकरण झालं, तेंव्हा मी राजकारणात नव्हतो, तसंच कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी पुर्णपणे सहमत असतोच असं नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहीं विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका करतो.

शिवाय एक कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्याला एक गोष्ट मांडायची असताना ते कलाकार म्हणून माझ्याकडे आले आणि मी ती भूमिका केली. एवढी साधी ही गोष्ट आहे. तसंच कलाकार आणि राजकीय भूमिका या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे आणि सुजाण नागरिक ही गोष्ट पाळतील अशी माझी खात्री आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT