Nana Patekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: मी सेल्फी घेण्यास गेलो होतो, पण... नाना पाटेकरांनी टपली मारलेल्या तरुणाची प्रतिक्रिया

Nana Patekar: नाना पाटेकर यांनी चापट मारलेल्या चाहत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nana Patekar News:

नाना पाटेकर यांनी वाराणसी येथे शुटिंग करत असताना एका चाहत्याला चापट मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणावर स्वतः नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नानांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. तर आता ज्या चाहत्याला नानांनी चापट मारली होती त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नानांनी ज्या चाहत्याला मारलं होतं तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर नानांनी स्वतः चाहत्यांची माफी मागितली. यानंतर आता चापट मारलेल्या चाहत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी घ्यायला गेल्यावर नानांनी एक चाहत्याला चापट मारली. त्याने एका मीडिया चॅनलला मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, 'घाटावर कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे की नाही किंवा कोणी सेलिब्रिटी आहे याची मला माहिती नव्हती. मी नेहमीच घाटावर जातो. त्याचप्रमाणे मी घाटावर अंघोळीला गेलो होतो.

तेव्हा मला समजले की, जवळच नाना पाटेकर चित्रपटाचे शुटिंग करत आहेत. त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या बाउन्सरने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांच्याजवळ गेलो. त्यानंतर मी नानांसोबत सेल्फी घ्यायला जाणार तोच नानांनी मला चापट मारली. त्यानंतर त्यांच्या बाउन्सरने मला बाहेर काढलं. या सर्व घटनेनं माझ्या विभागात माझी इज्जत गेली आहे. त्याचसोबत नानांनी मला परत बोलावलं हे सर्व खोट आहे. असं काहीच घडलं नाही'.

नानांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न चाहत्याला विचारण्यात आला. यावर त्याने नकार दिला. त्याने या सर्व प्रकरणावर त्याच्या मनातील भावना व्यक्त केला.

नाना पाटेकर यांनी मागितली माफी

नाना पाटेकरांनी ही घटना घडल्यावर व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली. हे कृत्य गैरसमजातून झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाना पाटेकर सध्या 'जर्नी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT