नाना पाटेकरांचे गोव्यात निधन
नानांनी २.३० पहाटे मित्राला केला होता कॉल
नाना पाटेकरांनी ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. नानांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने नानांचे निधन झाले. त्यांनी मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी नानांच्या अखेरच्या क्षणांची संपूर्ण माहिती दिली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना पहाटे ४:२० च्या सुमारास अस्वस्थ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना सीपीआर देण्यात आला, परंतू ते वाचू शकले नाहीत आणि पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नाना पाटेकर यांनी पहाटे २:३० च्या सुमारास एका मित्राला अस्वस्थ वाटत असल्याची आणि डाव्या बाजूला वेदना होत असल्याची माहिती देणारा मेसेज केला होता. रात्र झाल्यामुळे त्यांच्या मित्राला तो संदेश वेळेवर मिळू शकला नाही. जेव्हा पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मित्र त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा नाना पाटेकर यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि ते घामाने चिंब भिजले होते. त्यानंतर त्यांनी केयर टेकरच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत ते पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. त्यांना घरातूनच सीपीआर (CPR) देऊन रुग्णालयात आणण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे, नियमांनुसार वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.