Nagraj Manjule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule:नागराज मंजुळेंची मराठी चित्रपटातील नाळ तुटेना, लवकरच 'नाळ २' प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'नाळ २' चित्रपटाची घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नाव उच्चारल्यावर डोळ्यासमोर चित्रपट येतात ते फॅन्ड्री, सैराट, नाळ, झूंड. या चारही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नागराज मंजुळेच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याच्या दमदार चित्रपटातील एक चित्रपट म्हणजे 'नाळ'. त्या चित्रपटात चैत्याची भूमिका श्रीनिवास पोकळे, चैत्याची आई म्हणजे देविका दफ्तरदार आणि चैत्याच्या वडिलांची भूमिका खुद्द नागराज मंजुळेनी साकारली होती. चित्रपटाचा शेवट अनेक अनुत्तरित प्रश्नांनी झाला होता. येत्या भागात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळणार आहेत.

नागराज मंजुळाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'नाळ २' चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुधाकर, नागराज, देविका व श्रीनिवास दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ,'मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करत सांगितला की, नाळचा दुसरा भाग लिहीला आहे. ऐकवायला कधी भेटुया? नाळच्या दुसऱ्या भागात काय होऊ शकते याबाबत मला खूप उत्सुकता होती. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केले. पहिल्या "नाळ" प्रमाणेच 'नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! "नाळ 2" च्या नावानं चांगभलं !!! '

नागराजच्या या आगामी चित्रपटाने त्याचे चाहते नक्कीच आनंदीत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT