Nagraj Manjule SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांचा खाशाबा जाधव चित्रपट वादाच्या भोवर्‍यात, प्रकरण न्यायालयात

Nagraj Manjule Khashaba Jadhav Film Story Controversy : नागराज मंजुळे यांच्या खाशाबा जाधव चित्रपटाची कथेवर सध्या वाद सुरू झाले आहेत. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहे.

Shreya Maskar

मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या निवडलेल्या कथा काळजाला भिडतात. त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यांचा सैराट चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर घर करून आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.

खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे राईट्स 2001पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडेच आहेत. चित्रपटाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अ‍ॅड.रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.

खाशाबा जाधव हे पैलवान होते. खाशाबा जाधव यांचा देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे.खाशाबा यांना भारत सरकारने कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT