Naga chaitanya talking about divorce with samantha ruth prabhu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga chaitanya and Samanth: सामंथासोबतच्या नात्याबद्दल नागा चैतन्य पहिल्यांदाच बोलला, राग व्यक्त करत म्हणाला - मला गुन्हेगारासारखं...

Naga chaitanya talking about divorce with samantha ruth prabhu : नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभू यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला. इतक्या वर्षांनी, अभिनेता याबद्दल उघडपणे बोलला आहे.

Shruti Vilas Kadam

Naga chaitanya and Samanth: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचे वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षाही जास्त चर्चेत असते. विशेषतः नागा चैतन्य आणि समांथाच्या डिव्होर्सच्या बातम्या येऊ लागल्यापासून तो अधिकच चर्चेत आहे. २०२१ मध्ये, समांथा आणि नागा चैतन्यचा डिव्होर्स झाला, त्यानंतर गेल्या वर्षी अभिनेत्याने दुसरे लग्न केले. आता नागा चैतन्य त्याच्या आयुष्यात पुढे जाताना आणि त्याच्या नवीन आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.

नागा चैतन्य सध्या त्याच्या आगामी 'थांडेल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याची मुख्य अभिनेत्री साई पल्लवी आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, जेव्हा अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की तो आणि त्याची पूर्व पत्नी समांथा दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तो पुढे म्हणाला की, आम्हाला दोघांनाही आपापल्या पद्धतीने पुढे जायचे होते आणि आता आम्ही पुढे जात आहोत, पण मला अजूनही समजत नाही की लोकांना अजूनही यात स्पष्टीकरण का हवे आहे.

'आमचे आयुष्य हेडलाइन बनले आहे'

एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की आम्हाला आमच्या पद्धतीने पुढे जायचे होते आणि आमच्या स्वतःच्या कारणांसाठी, आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला, यासाठी आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत, पण मला आणखी काय स्पष्टीकरण देण्याची गरज आहे ते समजत नाही. आम्ही प्रायव्हसीची मागणी केली होती म्हणून प्रेक्षक आणि माध्यमे त्याचा आदर करतील अशी मला आशा होती, पण तसे झाले नाही आणि आमचे आयुष्य त्यांची हेडलाइन बनली.

निर्णय विचारपूर्वक घेतला

पुढे, अभिनेता म्हणाला की आम्ही दोघेही आमचे आयुष्य जगत आहोत. मला पुन्हा प्रेम मिळाले याचा मला खूप आनंद आहे. तो पुढे म्हणाला की, मी समंथाचा खूप आदर करतो. डिव्होर्स फक्त माझाच झाला आहे असे नाही, मग लोक माझ्याशीच गुन्हेगारासारखे का वागतात? आमचे आयुष्य लोकांमध्ये गप्पांचा विषय बनले आहे. समंथासोबतचे नाते संपवण्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी एका तुटलेल्या कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मला माहित आहे की ती भावना कशी असते." म्हणून, आम्ही जो काही निर्णय घेतला तो सर्वांना माहिती देऊन आणि काळजीपूर्वक विचार करून घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT