Naga Chaitanya And Samantha Prabhu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya And Samantha Prabhu: संमाथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

Naga Chaitanya-Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Naga Chaitanya Post :

दाक्षिणात्य अभिनेत्री संमाथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल होते. त्यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. परंतु आता पुन्हा संमाथा आणि नागा चैतन्य एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

संमाथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर चार वर्षांत या दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र, आता नागा चैतन्यच्या एका पोस्टमुळे त्यांच्यातील वाद मिटले असल्याच्या चर्चा होत आहे.

अभिनेता नागा चैतन्यने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एका कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. हा संमाथाचा पाळीव कुत्रा 'हॅश' आहे. हॅशचा फोटो शेअर करत नाग चैतन्यने 'Vibe' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोनंतर संमाथा आणि नागा चैतन्यचे पॅचअप झाल्याचे चर्चा रंगू लागल्या आहेत. संमाथा सध्या इटलीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. इटलीतून ती फोटो शेअर करत असते. त्यामुळे संमथाच्या अनुपस्थितीत नागा चैतन्य तिच्या 'हॅश'ची काळजी घेत असल्याचे म्हटले जात आहे.

नागा चैतन्यच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे. त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी संमाथा आणि नागा चैतन्य यांचे पॅचअप झाल्याचेही म्हटले आहे. तर अनेकांनी हे दोघे एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नागा चैतन्य आणि संमाथाची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. हे दोघे एकमेकांना 'चेसॉ' चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT