Raveena Tondon saam TV
मनोरंजन बातम्या

Raveena Tondon : अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेला मारहाण? Video Viral

Raveena Tondon Viral Video : वांद्रामधील रिझवी कॉलेजच्या परिसरात रवीना टंडनच्या कार ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

Chetan Bodke

मुंबईतील वांद्रे भागात अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveena Tandon) ड्रायव्हरने एका अनोळखी महिलेवर गाडी घातल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच रवीनाने त्या वृद्धमहिलेला आणि एका मुलीला मारहाण केल्याचा दावाही एका व्यक्तीने केला आहे. यामुळे अभिनेत्री सध्या कमालीची चर्चेत आली आहे.

दरम्यान, ही घटना वांद्रातील रिझवी कॉलेजजवळ घडली आहे. रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला आणि एका मुलीला जखमी केले आहे. घटना घडल्यानंतर विनाकारण रवीनाने त्या महिलेसोबत आणि त्या मुलीसोबत वाद घालू लागली. आणि अचानक तिने विनाकारण त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्री तुफान ट्रोल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रविना टंडनच्या ड्रायव्हरला स्थानिकांनी मारहाण करताच त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसली.

वयोवृद्ध महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही रिझवी कॉलेजच्या इथून चाललो होतो. त्यावेळी तिथे रविनाची कार उभी होती. आम्ही जात असताना अचानक ती कार मागे आली. त्यामुळे आईला थोडी दुखापत झाली. तर आमचं आणि त्या ड्रायव्हरचं थोडं भांडण झालं. त्या कारमध्ये अभिनेत्री रविनाही होती. ती काही प्रमाणात नशेमध्ये असल्यामुळे ती आमच्यासोबत भांडायला ही लागली आणि तिने आम्हाला मारहाण ही केली. " दरम्यान, आम्ही या प्रकरणाची नोंद खार पोलिस स्टेशनमध्ये केली असून आम्हाला न्यायाची अपेक्षा करत असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT