Mumbai Police Released LOC In Salman Khan Case: अभिनेता सलमान खान याला गेल्या काही महिन्यानापासून अनेक धमकीचे कॉल, मेसेज आणि ई-मेल येत आहेत. सलमान खानच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षितेत देखील वाढ करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.
चित्रपट अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या संशयित आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी LOC जारी केली आहे. हा संशयित हरियाणाचा रहिवासी असून तो यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. पोलिसांनी या संशयिताविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी केले आहे.
या संशयिताने मार्च महिन्यात सलमान खानला गोल्डी ब्रारच्या नावाने ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा धमकीचा ईमेल सलमानच्या जवळच्या मित्राला मिळाला होता आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (Latest Entertainment News)
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपविण्याची धमकी दिली होती. काळवीट मारल्याप्रकरणी सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितल्यानंतरच हे प्रकरण संपेल, असे देखील लॉरेन्स बिश्नोईने म्हटले होते. सलमानला जीवे मारणे हे त्याचे ध्येय असल्याचे सुद्धा त्याने सांगितले होते.
मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे, तसेच सलमान देखील त्याच्या सुरक्षेबाबत खूप दक्ष आहे. सलमान खानला नुकतेच बंदूक बाळगण्याचा परवाना(Gun License) मिळाला आहे. सलमान खानने त्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.
सलमान खान त्याला येणाऱ्या धमक्यांव्यतिरिक्त अनेक कारणांनी चर्चेत असतो. सलमान खान भविष्यात कारण जोहरसोबत काम करणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत आहे. तसेच टायगर वर्सेस पठान या चित्रपटामध्ये सलमान आणि शाहरुख एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत. तसेच लवकरच सलमान आणि कतरिनाचा टायगर ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.