Tim David Home Minister Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

आदेश बांदेकरांनंतर Tim David देणार पैठणी?; Mumbai Indians ने शेअर केलेल्या ‘होम मिनिस्टर’च्या व्हिडीओवर भाऊजींची भन्नाट प्रतिक्रिया

Tim David Video: क्रिकेटर टीम डेव्हिडने झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘होम मिनिस्टर’च्या टायटल साँगवर एक व्हिडीओ क्रिएट करून शेअर केला आहे. व्हिडीओवर आदेश बांदेकर यांनी केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Chetan Bodke

Tim David Home Minister Video

येत्या २२ मार्चपासून आयपीएल २०२४ (IPL 2024) ला सुरूवात होणार आहे. आयपीएलमधील सुप्रसिद्ध संघ 'मुंबई इंडियन्स'ची (Mumbai Indians) सध्या जोरदार चर्चा होत आहे. अशातच सध्या इन्स्टाग्रामवर टीम डेव्हिडचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. क्रिकेटर टीम डेव्हिडने झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘होम मिनिस्टर’च्या टायटल साँगवर एक व्हिडीओ क्रिएट करून शेअर केला आहे. या व्हिडीओवर आदेश बांदेकर यांनी केलेल्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Mumbai Indians)

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘होम मिनिस्टर’ गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. या शोच्या सुत्रसंचालनाची धुरा आदेश बांदेकर यांच्याकडे आहे. नुकताच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएल टीमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या टायटल साँगवरील एक व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओमध्ये टीम डेव्हिडचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तो महिलांना नमस्कार करताना, महिलांचे कौतुक करताना आणि त्यांना आपल्या हातून पैठणी देताना दिसत आहे. सध्या डेव्हिडच्या ह्या व्हिडीओची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे. (Zee Marathi)

मुंबई इंडियन्स टीमने हा व्हिडीओ शेअर करताना, "दार उघड बये.. दार उघड, टीम भाऊ-जी आले आहेत!" असं कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर आदेश बांदेकर यांनी देखील भन्नाट कमेंट केली आहे. त्यांच्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "वाह! टिम जिंकलीच पाहिजे धाकटे भाऊजी" अशी कमेंट आदेश बांदेकर यांनी केली. त्यांच्या या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधले. (Tv Serial)

२२ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग 2024 ला सुरुवात होणार आहे. यंदा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे 'मुंबई इंडियन्स' संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. मुंबई इंडियन्स संघाचा पहिला क्रिकेट सामना गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. हा सामना २४ मार्चला अहमदाबाद येथे होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT