Mahesh Pandey Arrested  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai News: खळबळजनक! प्रसिद्ध मालिकेच्या लेखकाला अटक, निर्मात्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

Mahesh Pandey Arrested For 2.65 crore Fraud with producer: टीव्ही क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आलीय. एका लोकप्रिय मालिकेच्या लेखकाला अटक करण्यात आलीय.

Rohini Gudaghe

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी खळबळजनक घटना समोर आलीय. एका लोकप्रिय मालिकेच्या लेखकाला अटक करण्यात आलीय. लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की'या मालिकेच्या कथेचे लेखक महेश पांडे यांना अटक करण्यात आलीय. निर्मात्याला कोट्यवधींना फसवल्याचा आरोप महेश पांडेवर करण्यात आलाय. २.६५ कोटीं रुपयांची निर्मात्याची फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे.

प्रसिद्ध मालिकेच्या लेखकाला अटक

निर्माता आणि लेखकावर निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. महेश पांडे, असं अटक करण्यात आलेल्या निर्माता, लेखकाचं नाव आहे. आंबोली पोलिसांनी ही कारवाई केलीय. 'कसौटी जिंदगी की' ही मालिका घरांघरांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. महेश पांडे हे भारतीय टीव्ही उद्योगातील प्रसिद्ध पटकथा, लेखक आणि निर्माता (Kasauty Zindagi Ke) आहेत. आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कसौटी जिंदगी की' मालिकेचे पटकथा लेखक महेश पांडेला एका चित्रपट निर्मात्याची २.६५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

निर्मात्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

महेश पांडेविरूद्ध तक्रार केलेल्या निर्मात्याचं नाव जतिन सेठी आहे. 'जतिन सेठी'ने केलेल्या तक्रारीवरून महेश पांडे यांना अटक करण्यात आलीय. जतिन सेठीने महेश पांडेला सुमारे २. ६५ कोटी रुपये उधार दिल्याचा आरोप केला (Mumbai News) होता. पांडेने ते पैसे परत करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, पांडेने पैसे परत केले नाहीत. सध्या महेश पांडे न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळतेय.

मनोरंजन क्षेत्रात खळबळ

महेश पांडे यांचे टीव्ही उद्योगात अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. 'कसौटी जिंदगी की' या एका प्रसिद्ध मालिकेची कथा देखील त्यांनी लिहिली होती. यामध्ये प्रेरणाची भूमिका साकारणाऱ्या श्वेता तिवारी आणि अनुराग बसूची भूमिका साकारणाऱ्या सेझन खान सारख्या उत्कृष्ट कलाकार (crime news) होत्या. पांडेला एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की, या मालिकेमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. परंतु आता त्यांना झालेल्या अटकेनंतर मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT