Radhika Marchant And Shloka Mehta Ambani  Instagram @radhikamerchant_
मनोरंजन बातम्या

Shloka Ambani In NMACC: अंबानींच्या सुनेकडे गुड न्यूज; बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

Ambani's Daughter In Law: श्लोकाने पापाराझींसमोर तिचे बेबी बंप फ्लॉंट केले.

Pooja Dange

Mom To Be Shloka Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा आजोबा बनणार आहेत. आकाश अंबानीच पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा गरोदर आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका पापाराझींसमोर आले. यादरम्यान श्लोकाने तिचे बेबी बंप फ्लॉंट केले.

ता कार्यक्रमाच्या वेळी श्लोका मेहताने सुंदर लेहेंगा परिधान केला होता. एम्ब्रॉयडरी वर्क असलेला राखाडी रंगाचा लेहेंगा श्लोकाने घातला होता. यासोबतच तिने तिचा लूक शोभा वाढविण्यासाठी हेड पीस घातला होता. डायमंड ज्वेलरीमुळे तिचा लूक रॉयल दिसत होता.

सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट पुनीत बी सैनीने इंस्टाग्रामवर श्लोका मेहताचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “तेजस्वी आणि सुंदर. लवकरच आई होणार आहे... खूप सुंदर श्लोका मेहता.

श्लोका मेहता सासरे मुकेश अंबानी आणि पती आकाश अंबानीसह कार्यक्रमात जाताना दिसली. तिघांनीही पापाराझींसमोर पोज दिली. या फॅमिली फंक्शनमध्ये श्लोका खूपच खूश दिसत होती. तिचे बेबी बंप असलेले हे फोटो पहिल्यांदा समोर आले आहेत. सोशल मीडियावरही हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोघांना पृथ्वी नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. आता पुन्हा एकदा अंबानी कुटुंबात लहान पाहुणा येणार आहे.

31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. सलमान खान, सैफ अली खान, आमिर खान, रणवीर सिंग, वरुण धवन, शाहरुख खान, करीना कपूर खान, विद्या बालन, दिशा पटानी यांच्यासह अनेक स्टार्सनी पार्टीची रंगात वाढवली. यामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सही सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT