Neeta and Mukesh Ambani gifted Gold To Ram Charan - Upasana's Baby Girl Instagram @upasanakaminenikonidela
मनोरंजन बातम्या

Mukesh - Nita Ambani Gift To Ram Charan Baby : चर्चा तर होणारच! नीता - मुकेश अंबानींनी राम चरण मुलीला देईल कोट्यवधींची भेट

Golden Cradle Of Ram Charan Daughter : राम चरणच्या मुलीला अंबानीनी चक्क सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे.

Pooja Dange

Ram Charan And Upasana’s Baby : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. उपासनाने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. राम चरणवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी राम चरणच्या मुलीला भेटवस्तू पाठवल्या आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक कुटुंबाने देखील राम चरण अंडी उपासनाच्या मुलीला भेट दिली आहे.

राम चरणच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाले आहे. २० जून रोजी उपासनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर राम चरणने बाबा झाल्याचे सांगितले. त्याच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राम चरणची मुलगी म्हणजे तिचा थाटही तितकाच हटके असणार. हॉस्पिटलमधून परत येताना राम चरणने लेकीवर गुलांबाच्या पाकळ्यांनी वर्षाव ही केला होता. राम चरणच्या मुलीचे लाड पुरवायला आता अंबानी दाम्पत्या देखील मागे नाही.

नीता-मुकेश अंबानी अब्जावदींचे मालक आहेत. राम चरण आणि अंबानी कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. आता राम चरणच्या मुलीला अंबानीनी चक्क सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. या पाळण्याची किंमत १ कोटी इतकी आहे. अंबानीनी राम चरणच्या मुलीला दिलेल्या या भेटवस्तूची सर्वत्र चर्चा होत आहे. या भेटवस्तूमुळे मात्र अंबानी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नुकतचं राम चरणच्या मुलीचा नामकरण सोहळा पार पडला. राम चरणने मुलीचे नाव सोशल मीडियावरुन जाहीर केले आहे. राम चरणच्या मुलीचे नाव 'कलिन कारा कोनिडेला' असे आहे. राम चरणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंबानी कुटुंब हे जगातील श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे. नुकतेच नीता-मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. श्लोकानेही गोड मुलीला जन्म दिला आहे. अंबानीनी नातीचं स्वागतही दणक्यात केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT