Mukesh Ambani Social Media
मनोरंजन बातम्या

Mukesh Ambani: मुकेश अंबानी टॉप १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; संपत्तीत तब्बल 'इतकी' घट; तर आता पहिल्या स्थानी कोण?

Mukesh Ambani: मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. अंबानींच्या संपत्तीत घट झाली. तर, आता पहिला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ठरला आहे.

Shruti Vilas Kadam

Mukesh Ambani: मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. अंबानींच्या एकूण संपत्तीत १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली. दुसरीकडे, रोशनी नाडर ही श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर आता पहिला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ठरला आहे.

गेल्या एका वर्षात मुकेश अंबानी यांना १ लाख कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. दरम्यान, अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत घट होत आहे. अहवालांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या एनर्जी आणि किरकोळ व्यवसायात अनेक अडचणी येत आहे. खरं तर, विक्रीतील मंद वाढ आणि कर्जाबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळे समूहाच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या अंबानी कुटुंबाकडे ८.६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती सुमारे १३ टक्क्यांनी म्हणजेच १ लाख कोटी रुपयांनी घट झाली आहे.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती

अंबानी कुटुंबाकडे ८.६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे डॉल्फिन आणि सिकोर्स्की एस ७६ हेलिकॉप्टर ही दोन हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या घरात अँटिलियामध्ये तीन हेलिपॅड आहेत. या हेलिपॅडवरून मुंबई शहर आणि अरबी समुद्र स्पष्टपणे दिसतो. मुकेश अंबानींकडे अनेक खाजगी जेट विमाने देखील आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे एक एअरबस A319 ACJ, एक एअरबस AS365, एक बोईंग 737 MAX 9 BBJ, तीन बॉम्बार्डियर ग्लोबल फॅमिली, दोन डसॉल्ट फाल्कन 900, एक एम्ब्रेर ERJ-135 ही विमाने आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे १० रोल्स रॉयस कार देखील आहेत. अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे घर आहे आणि त्याची अंदाजे किंमत १५,००० कोटी रुपये आहे.

रोशनी नाडरची एकूण संपत्ती

रोशनी नाडर ही जगातील टॉप १० श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट झालेली पहिली भारतीय महिला आहे. रोशनी नाडर मल्होत्राची एकूण संपत्ती ३.५ लाख कोटी रुपये आहे. रोशनी नाडरचे वडील शिव नाडर यांनी तिला एचसीएलमध्ये ४७% हिस्सा दिला आहे, त्यामुळे ती कंपनीतील सर्वात मोठी भागधारक बनली आहे. रोशनी नाडर ही एचसीएल टेक्नॉलॉजीजची अध्यक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT