Mufasa - The Lion King : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा: द रुल'ने सर्वत्र आपली छाप पाडली आहे, या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या सर्व नजरा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रांवर आहेत, ज्यात 'मुफासा: द लायन किंग', 'वनवास', 'विदुथलाई 2', 'UI' आणि 'मॅक्रो' या चित्रपटांचा समावेश आहेत. हे सर्व चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले. हे सर्व चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत, त्यापैकी 'मुफासा'ने कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.
बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित डिस्नेच्या 'मुफासा: द लायन किंग'ने पहिल्याच दिवशी खूप चांगले कलेक्शन केले. या चित्रपटाच्या हिंदी डबसाठी शाहरुख खान आणि त्याची मुले आर्यन खान आणि अबराम खान यांनी 'मुफासा'च्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे, तर तामिळ डबसाठी महेश बाबूने आपला आवाज दिला आहे. मात्र, 'मुफासा : द लायन किंग' आघाडीवर असताना, बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसलेल्या नाना पाटेकर यांच्या 'वनवास' या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही.
‘मुफासा : द लायन किंग’ आघाडीवर
सर्व चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, 'मुफासा: द लायन किंग'ने दोन दिवसांत 22.80 कोटींची कमाई केली असून, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे . या चित्रपटानंतर ज्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलेक्शन केले आहे ते म्हणजे 'विदुथलाई 2' हा तमिळ भाषेतील क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. ‘विदुथलाई’चा पहिला भाग गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने दुस-या दिवशी सर्व भाषांमध्ये अंदाजे 8 कोटी रुपये कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 15.50 कोटी रुपये झाली आहे.
कन्नड-मल्याळम चित्रपटांची लोकप्रियता
तर कन्नड भाषेतील सायन्स फिक्शन ॲक्शन फिल्म 'UI' ने एकूण 13.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी दुसऱ्या दिवसाची अंदाजे 6.50 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच उन्नी मुकुंदन स्टारर मल्याळम चित्रपट 'मार्को 2' ने दुस-या दिवशी 4.65 कोटी रुपयांची अंदाजे कमवले असून, दोन्ही दिवसांची कमाई जोडून त्याने 8.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नाना पाटेकर यांच्या 'वनवास' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाच्या कमाईत वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात ६ लाख रुपयांनी झाली होती, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ९५ लाख रुपयांचा आकडा गाठला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.