uday pandhi saam tv
मनोरंजन बातम्या

Hustle 03 : दिल्लीच्या उदय पांधीने जिंकली 'हसल ०३'ची ट्रॉफी, १८ वर्षांच्या रॅपरला बक्षीस म्हणून मिळाले इतके लाख रुपये?

Uday Pandhi: उदय पांधी हा १८ वर्षांचा असून तो दिल्लीत राहतो. 'हसल ०३' च्या या संपूर्ण सीझनमध्ये उदयच्या अतुलनीय रॅप सिंगिगने बादशाह ते रफ्तारसारख्या सर्व दिग्गजांनाही थक्क केले होते.

Priya More

Hustle 03 Winner Uday Pandhi:

देशातील रॅप सिंगिंग रिअॅलिटी टीव्ही शो 'MTV Hustle 03 Represent' हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या शोला नवा विजेता मिळाला आहे. टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा शो संपला. दिल्लीचा उदय पांधीने या शोची ट्रॉफी आपल्या नावावर कोरली आहे. उदय पांधीला या शोच्या ट्रॉफीसह १० लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. सध्या उदय पांधीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

उदय पांधी हा १८ वर्षांचा असून तो दिल्लीत राहतो. 'हसल ०३' च्या या संपूर्ण सीझनमध्ये उदयच्या अतुलनीय रॅप सिंगिगने बादशाह ते रफ्तारसारख्या सर्व दिग्गजांनाही थक्क केले होते. हा शो जिंकल्याचे जाहिर होताच उदयला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तो 'बॅटल रॅप'साठी ओळखला जातो. उदय गेल्या ९ वर्षांपासून देशाची राजधानी दिल्लीत रॅपिंग करत आहे. उदय पांधी या शोचा सर्वात कमी वयाचा तरुण रॅपर विजेता ठरला आहे. उदयला १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि २.५ लाख रुपयांचे प्रायोजित बक्षीसही देण्यात आले.

'हसल ०३' च्या ग्रँड फिनालेमध्ये उदय पांधीसोबत झाशीचे बासिक आणि 100 RBH देखील होते. ग्रँड फिनालेमध्ये या तिघांमध्ये चुरशीची लढत झाली. बासिकची प्रथम उपविजेता म्हणून निवड झाली, तर अमरावतीच्या 100 RBH द्वितीय उपविजेता ठरला आहे. बासिक २२ वर्षांचा आहे. ग्रॅण्ड फिनाले एपिसोडमध्ये एकूण 6 फायनलिस्ट सहभागी झाले होते.

या शोची ट्रॉफी जिंकल्यामुळे उदय पांधी खूपच आनंदी झाला आहे. विजेता झाल्यानंतर त्याने सांगितले की, 'MTV Hustle 03 Represent हे माझ्यासाठी एका व्यासपीठापेक्षा मोठे आहे. माझ्या गायनात आणि लेखनात शिकण्याची, मेहनत घेण्याची आणि प्रयोग करण्याची ही माझ्यासाठी उत्तम संधी आहे. आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आणि एक कलाकार म्हणून स्वतःला पुढे नेण्याची संधी मिळाली. माझ्या टीमचे बॉस, डी एमसी यांनी मला खूप पाठिंबा दिला. ही ट्रॉफी जिंकणे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT