Sargam Koushal wins Mrs World 2022 Instagram @sargam3
मनोरंजन बातम्या

Mrs World: २१ वर्षांनी भारताला मिळाला बहुमान, सरगम कौशलने पटकावला मिसेस वर्ल्डचा किताब

भारताची सरगम कौशल झाली मिसेस वर्ल्ड, २१ वर्षांनी भारताला मिळवून दिला बहुमान.

Pooja Dange

Mrs World 2022: जम्मूच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड हा 'किताब जिंकून भारताच्या बहुमानात मनाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत ६३ देशातील महिला सहभागी झाल्या होत्या. २१ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे. २००१ साली डॉ. अदिती गोवित्रीकरने हा किताब जिंकला होता.

मिसेस वर्ल्ड झाल्यानंतर सरगम कौशल यांनी एक विडिओ शेअर केला आहे. 'मी खूप आनंदी आहे. '२१-२२ वर्षांनी आपल्याला हा मुकुट परत मिळाला आहे. मी खूप उत्साहित आहे लव्ह यु इंडिया, लव्ह वर्ल्ड.' ३२ वर्षीय सरगम कौशल मूळ जम्मू-काश्मीरची आहे. सरगमने इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सरगम विशाखापट्टनम शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ साली सरगम कौशलचे लग्न झाले. तिचे पती इंडियन नेव्हीमध्ये आहे. (Celebrity)

मिसेस वर्ल्ड ही स्पर्धेचे नाव पहिले मिसेस अमेरिका होते. त्यानंतर ते बदलून 'मिसेस वूमन ऑफ द वर्ल्ड' करण्यात आले. १९८८ पासून या स्पर्धेला 'मिसेस वर्ल्ड' या नावाने ओळखले जाऊ लागले. गेल्या काही वर्षांपासून ८० देशातील महिला या देशात सहभागी होत आहेत. (World)

२००१ मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला. हे विजेतेपद पटकावणारी अदिती ही पहिली भारतीय महिला ठरली. अदिती एक अभिनेत्री आहे. भेजा फ्राय, दे दाना दान, स्माईल प्लीज यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अदिती २०२२ च्या स्पर्धेत ज्युरी म्हणून सहभागी झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT