Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा 'पठान' चित्रपटावरून संपूर्ण देशात वाद पेटला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे अनेक धार्मिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. नरोत्तम मिश्रा नंतर विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनी पठान चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी शाहरुख खानला चॅलेंज केले आहे.
पठान चित्रपटावरून मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनी शाहरुख खानला चॅलेंज करता म्हटले आहे की, स्वतःच्या मुलीसोबत हा चित्रपट बघून दाखव शाहरुख. मी चॅलेंज करतो कि अशाप्रकारचा चित्रपट पैगंबरवर बनवून दाखवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशात आणि जगात हिंसक वातावरण निर्माण होईल. कॅनडामध्ये पैगंबरबाबत गरादोळ झाला होता. त्याच्या परिणाम मुंबई सुद्धा दिसून आला होता. मुबंईत जाळपोळ करण्यात अली होती आणि जवळ-जवळ १०० झाले होते.
"मी शारुख खानला सांगतो की तुझी मुलगी सुद्धा २३-२४ वर्षाची झाली असेल. तिच्यासोबत बसून चित्रपट बघ. मग सांग की हा चित्रपट मी माझ्या मुलीसोबत बघत आहे. भगवा रंग देशाचे गौरव चिन्ह आहे. हिंदू धर्माशी निगडित भगवा रंग बेशरम कसा? हिरव्याचा सन्मान आणि भगव्याचा अपमान, हे योग्य नाही. इतकाच आहे तर तुझ्या मुलीसोबत चित्रपट बघ. तेव्हा आम्हाला पटेल की यात काहीही अयोग्य नाही. (Shah Rukh Khan)
जेव्हा हिंदू धर्मावर टीका होते तेव्हा सर्वजण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणत सोडून देतात. जेव्हा त्यांच्या धर्मावर काही बोलले जाते तेव्हा सगळेच आक्रमक होतात. यांच्या पैगंबरविषयी बोलल्यास हत्या होते नई आमच्या देवाला शिव्या देणार." अशा शब्दात मध्यप्रदेशचे विधानसभा गिरीश गौतम यांनी पठान चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पठान चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटमध्य शाहरुखसह दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे खूप ट्रेंड होत आहे. 'पठान' चित्रपटातून शाहरुख ४-५ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. (Movie)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.