Mrs India Beauty Pageant Jyoti Arora
Mrs India Beauty Pageant Jyoti Arora Instagram
मनोरंजन बातम्या

Mrs India Beauty Pageant: अखेर ज्योती अरोरा ठरली ‘मिसेस इंडिया’, पटकावला मानाचा पुरस्कार

Chetan Bodke

Mrs India Beauty Pageant: अकरा वर्षांपासून एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा म्हणून ‘मिसेस इंडिया पेजंट’ सौंदर्य स्पर्धेला ओळखले जाते. या वर्षी सुद्धा या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता होती. ‘मिसेस इंडिया पेजंट’ हे भारतातील विवाहित महिलांसाठीचे हक्काचे व्यासपीठ आहे. या वर्षी हा कार्यक्रम इरॉस हॉटेल, दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये ज्योती अरोरा ‘मिसेस इंडिया’ची विजेती ठरली. ज्योतिषी आणि फेंगशुई मास्टर ज्योती अरोरा यांनी ‘मिसेस’ या पदवीवर आपले नाव कोरले.

ज्योतिषी आणि फेंगशुई मास्टर ज्योती अरोरा यांनी 18 मार्च 2023 रोजी झालेल्या ‘मिसेस इंडिया ब्यूटी पेजंट’मध्ये क्लासिक श्रेणीत ‘मिसेस इंडिया’ हा किताब पटकवला. यावेळी त्यांच्या डोक्यावर विजेती पदाचे मुकूट चढवण्यात आले. 'मिसेस इंडिया पेजंट'च्या संचालिका दीपाली फडणीस यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी या कार्यक्रमात महत्त्वाची घोषणा केली. ‘मिसेस इंडिया’ची विजेती ज्योती अरोरा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे दिग्दर्शक दीपाली यांनी सांगितले. ती ‘मिसेस एशिया इंटरनॅशनल’मध्ये उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

ज्योती हे मीडिया इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ज्योतीने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. ती ज्योतिष, टेरोकार्ड रीडर आणि फेंगशुई कार्यक्रम सर्व राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर खूप लोकप्रिय आहेत.

राजकारण, क्रीडाविश्व किंवा सिनेमॅटोग्राफर यावर त्याचे भाकीत अगदी तंतोतंत बसतात. मुलींच्या शिक्षणात मुलांना समान अधिकार देण्यावर ज्योतीचा विश्वास आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून 13 वर्षे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम केले आहे. नंतर ज्योतीने टेरोकार्ड रीडर आणि ज्योतिषी म्हणून तिची कारकीर्द घडवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT