OTT Released In May 2023 Saam TV
मनोरंजन बातम्या

OTT Release This Week: मे महिन्याचे पुढील पंधरा दिवस तुफान गाजणार; भोला, बंदा, सिटी ऑफ ड्रीम सारखी मनोरंजनाची मेजवानी मिळणार

May OTT Released List: मे महिन्याच्या पुढील पंधरवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरीजची यादी

Pooja Dange

OTT Release In May 2023: सिनेरसिकांना नेहमीच काय नवीन पाहायला मिळेल याची उत्सुकता असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मे महिन्याच्या पुढील पंधरवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरीजची यादी घेऊन आलो आहोत. कधी, केव्हा, कुठे प्रदर्शित होणार नवीन वेबसीरीज आणि चित्रपट.

कहटल

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा नेहमीच चॅलेंजिंग व्यक्तिरेखा साकारत असते. अभिनेत्री लवकरच नेटफ्लिक्सच्या 'कहटल' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 19 मे रोजी नेटफ्लिक्सवर दाखल होईल. 'कहटल'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बांदा

मनोज बाजपेयी यांच्या चित्रपटांची आणि वेबसीरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. 'सिर्फ एक बंदा काफी है' या आगामी चित्रपटाद्वारे मनोज बाजपेयी पुन्हा एकदा ओटीटीवर राज्य करायला सज्ज झाले आहेत. 'बांदा'चा ट्रेलर प्रदर्शित आहे. मनोज बाजपेयी यांचा हा चित्रपट 23 मे 2023 रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल.

भेडिया

वरुण धवन आणि क्रिती सेननचा 'भेडिया' चित्रपट OTT वर प्रदर्शित होण्याची चाहते वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भेडिया 25 मे रोजी Jio Vootवर प्रदर्शित होऊ शकतो. हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.

भोला

अजय देवगणच्या 'भोला'च्या ओटीटी रिलीजवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बातमीनुसार, मे महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्राइमवर प्रदर्शित होईल. त्याची रिलीज डेट 25 मे ते 30 मे दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

हिंदी वेबसीरीज आणि चित्रपटांव्यतिरिक्त मे महिन्याच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर अनेक हॉलीवूड कलाकृती देखील पाहायला मिळतील. ज्यामध्ये सिटी ऑफ ड्रीम्सचा सीझन 3, अमेरिकन बॉर्न चायनीज, मॉडर्न लव्ह चेन्नई, झो किट्टी यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

Hingoli Crime: माझ्या पोरासोबत लग्न करायचं, मग माझ्याशी शारीरिक संबंध ठेव; बाप-लेकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Train Accident: धावत्या ट्रेनसमोर उडी मारत तरुणाची आत्महत्या, मृतदेह इंजिनमध्ये अकडून २० किमीपर्यंत फरफटत गेला

गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी, उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT