Ajay Devgn and Mohanlal to shoot Drishyam 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘Drishyam 3’साठी मोहनलाल आणि अजय देवगणने केली हात मिळवणी, चित्रपट प्रदर्शनासाठी उचलले महत्वाचे पाऊल...

Chetan Bodke

Drishyam 3 Film Update: साऊथ सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी 2013 मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर असलेला ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने हिंदीत, कमल हसनने तमिळमध्ये तर, व्यंकटेशने तेलुगू भाषेत चित्रपटाची निर्मिती केली होती. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू असून चित्रपटाबद्दल एक मोठी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

वास्तविक, मिळालेल्या माहितीनुसार, दृश्यमच्या निर्मात्यांनी तिसर्‍या भागासाठी हिंदी निर्मात्यांशी करार केला आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि त्यांच्या लेखकांच्या टीमने ‘दृश्यम ३’ साठी कथेतील ट्विस्ट्सची क्रमवारी लावली आहे. जीतू जोसेफ आणि त्यांच्या टीमला ते आवडले आहे आणि आता ते त्यासाठी स्क्रिप्ट तयार करण्याचे काम करत आहेत. 

‘दृश्यम ३’चे हिंदी आणि मल्याळम भाषेतील चित्रपट एकाच वेळी शूट करण्यासाठी आणि एकाच तारखेला संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. मोहनलाल पुन्हा मल्याळममधील गोर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगण हिंदी भाषेतील ‘दृश्यम’ मध्ये विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की एकदा दोन्ही चित्रपटांची पटकथा निश्चित झाल्यानंतर, तेलुगू दृश्यमचे निर्माते आणि हिंदी आणि मल्याळम टीम देखील त्याच तारखेला चित्रपट प्रदर्शित करतील. चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण त्याच्या सस्पेन्सच्या घटकाचा सर्वोत्कृष्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.

मीडिया रिपोर्टसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एकदा दोन्ही चित्रपटांची पटकथा निश्चित झाल्यानंतर, तेलुगू भाषेतील ‘दृश्यम’चे निर्माते, हिंदी आणि मल्याळम टीम देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहेत. चित्रपटासाठी सर्वच जण आता उत्सुक आहेत.

‘दृश्यम’च्या सिक्वेलमधील ‘दृश्यम ३’ हा अखेरचा चित्रपट असेल, अशी सध्या चर्चा होत आहे. चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अशातच, अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटात व्यग्र असून ‘सिंगम अगेन’ मध्येही तो काम करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan : डीजेच्या दणदणाटामुळे घोडा बिथरला, नवरदेवाला घेऊन पळाला; सूरजने सांगितला गावाकडेचा किस्सा

Cholesterol Control: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर 'या' पदार्थांचे सेवन टाळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचे आंदोलन

Justice V. Srishananda Case : न्यायमूर्तींनाचं भर न्यायालयात मागावी लागली माफी, सर्वोच्च न्यायालयाने घेतलं फैलावर; नेमकं काय आहे प्रकरण?

Chanakya Niti: 'अशा' चुका करणाऱ्या व्यक्तींकडे कधीच टिकत नाही पैसा, तुम्हीही अजिबात असं करू नका

SCROLL FOR NEXT