मुंबई: सुपर हॉट आऊटफिट्स आणि बोल्ड फोटोंमुळं (Bold Photos) सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली फॅशनिस्टा उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तोकडे कपडे घालून फॅशनच्या ट्रेंड्सला मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करणारी उर्फी आता नव्या वक्तव्यामुळं प्रकाशझोतात आली आहे. मुंबईत एका संगीत कार्यक्रमात उर्फी जावेद (Urfi Javed) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चांगलीच भडकली. मला कपड्यांवरून ट्रोल करू नका, तुम्हाला कपड्यांवर बोलायचं असेल, तर तुमच्या घरातील महिलांना बोला. माझ्यावर टीका केलेली मी खपवून घेणार नाही.असा सणसणीत इशारा उर्फीने ट्रोलर्सला दिला आहे. ( urfi javed brutally trolled in event at Mumbai)
उर्फी जावेद तिच्या बोल्डनेसमुळं आणि फॅशन स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असते. पापाराझी सुरु असताना उर्फीची झलक फॅशन फोटोग्राफर्स (Urfi javed trolled) कॅमेरात कैद करायला विसरत नाहीत. मात्र, मुंबईतील एका मोठ्या इव्हेंटमध्ये उर्फीने उपस्थिती दर्शवली आणि एका फोटोग्राफरवर चांगलीच भडकली. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
उर्फीने हिरव्या रंगाचा बॅकलेस शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी पापाराझी सुरु असताना उर्फीच्या कपड्यांबाबत टीका करण्यात आली. यावेळी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना उर्फी म्हणाली, माझ्या कपड्यांवर कमेंट करू नका. जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुमच्या घरातील महिलांवर करा, असं उर्फी म्हणाली. अलीकडेच उर्फी जावेदने 'झलक दिखला जा १०' या डान्स रिअॅलीटी शोमध्ये हजेरी लावली होती.उर्फीने बॅकलेस हिंरवा रंगाचा आऊटफिट घालून कार्यक्रमात रेड कार्पेटवर आली.
त्यावेळी एका फोटोग्राफरने, "आज ती नीट कपडे घालून आली आहे,अशी कमेंट एका फोटोग्राफरने केली होती. त्यानंतर उर्फीने पापाराझीच्या सुरू असताना ट्रोलर्सचा समाचार घेतला. उर्फीच्या फॅशन स्टाईलवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं,"कपडे लहान असले तरी चालेल पण डोक्यावर घेणे आवश्यक आहे. ही किती गरीब आहे? तर एका नेटकऱ्याने असा ड्रेस घालून कोणी कसं जाऊ शकतं? असं दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं. उर्फीचा या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.