Marathi Drama Play  saam Tv
मनोरंजन बातम्या

Drama : श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

Bharat Jadhav

Marathi Drama Play Mitrachi gosht:

नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन' ने एक मिशन सुरू केलं. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर बिंबवत आजवर वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या वर एकांकिका, अनेक दिर्घ अंक, ४० एक शॉर्टफिल्म केल्या आणि पुरस्कार पण मिळवलेत. त्यातल्याच विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकांचे प्रयोग श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत.(Latest News)

प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. आपण सर्वांनी ह्या प्रयोगांना येऊन आशीर्वाद , प्रोत्साहन द्यावे अशी विनंती अयोजकांनी केलीय.

सृजन द क्रियेशनचे सर्वेसर्वा अभिनेता - दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या प्रयत्नांनी सुरू हा उपक्रम चालवला जात आहे. अधिकाधिक नाट्यरसिकांनी या प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT