Miss Universe finalist Sienna Weir dies Instagram @sienna_weir
मनोरंजन बातम्या

Sienna Weir Lost Her Life: अखेर जीवनाशी झुंज अपयशी; घोडेस्वारी करताना झालेल्या अपघातानंतर २३ वर्षीय मॉडेलचे निधन

Miss Universe finalist Died: ऑस्ट्रेलियात घोडेस्वारी करत असताना मॉडेलचा भीषण अपघात झाला होता.

Pooja Dange

Miss Universe finalist Sienna Weir dies at 23: मिस युनिव्हर्स २०२२ ची फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल सिएना वेअरचे वयाच्या 23 व्या वर्षी घोडेस्वारी करताना झालेल्या अपघातानंतर दुःखद निधन झाले आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात घोडेस्वारी करत असताना मॉडेलचा भीषण अपघात झाला होता.

सिएना वेअर 2 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो ग्राउंड्सवर घोडेस्वारी करत असताना तिचा घोडा पडला. सिएना वेअरला गंभीर दुखापतींमुळे अनेक आठवडे लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

सिएना वेअर निधनाची बातमी तिच्या कुटुंबियांनी सांगितली. तिच्या कुटुंबीयांनी तिला लाइफ सपोर्ट काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तिची मॉडेलिंग एजन्सी स्कूप मॅनेजमेंटनेही तिच्या मृत्यूची पुष्टी केली आणि गुरुवारी तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. ''आमच्या हृदयात कायम असशील' असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. (Latest Entertainment News)

२०२२ च्या ऑस्ट्रेलियन मिस युनिव्हर्स स्पर्धेतील २७ फायनलिस्टपैकी एक सिएना वेअर होती. तिने सिडनी विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्रात दुहेरी पदवी घेतली होती. तिने पूर्वी स्थानिक आऊटलेट्सना सांगितले की तिची कारकीर्द पुढे अधिक यशस्वी करण्यासाठी ती यूकेला जाण्याची तयारी करत आहे आणि ''माझी बहीण, भाची आणि पुतण्यासोबत अधिक वेळ घालवत आहे. तसेच माझे व्यावसायिक आणि सोशल नेटवर्क दोन्ही वाढवत आहे.''

ऑस्ट्रेलियन फिटनेस मॉडेलला घोडेस्वारीची आवड होती. तिने गोल्ड कोस्ट मॅगझिनला सांगितले की, ''मी माझे बरेचसे आयुष्य शहरात जगले असले तरी मला शो जंपिंगचे खूप वेड आहे. माझ्या कुटुंबाला माझ्यात ही आवड कशी निर्माण झाली याविषयी पर्सनचिन्ह आहे.

पण मी ३ वर्षाची असल्यापासून घोडेस्वारी करत आहे आणि त्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. मी आठवड्यातून 2-3 वेळा सिडनीच्या ग्रामीण भागात प्रशिक्षण आणि स्पर्धा करण्यासाठी न्यू साउथ वेल्स किंवा प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला जाते.''

मॉडेलिंग इंडस्ट्रीतील मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांकडून सिएना वेअरला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत, अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर ख्रिस ड्वायर यांनी लिहिले, "तू जगातील सर्वात दयाळू व्यक्तींपैकी एक होतीस, तुम्ही आयुष्यात चैतन्य आणलास आणि तू गेल्यामुळे जगात काहीतरी हसवल्यासारखे वाटत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT