'बिग बॉस १६' आणि 'खतरों के खिलाडी १३' फेम अभिनेत्री अर्चना गौतमबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्चना आणि तिच्या वडिलांसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्चना आणि तिच्या वडिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची लोकसभा उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २९ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. अभिनेत्रीसोबत तिचे वडील देखील होते. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पोहचलेल्या अर्चना आणि तिच्या वडिलांना प्रवेश नाकारण्याच आला. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोघांना धक्काबुक्की करत बाचाबाचीही केली. त्याचसोबत अर्चना गौतमचे केसही ओढले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अर्चना गौतम काही लोकांवर जोरजोरात ओरडताना दिसत आहे. त्याचवेळी आणखी काही लोक तिच्यासोबत आणि तिच्या वडिलांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. अर्चना गौतमने आरोप केला आहे की, तिला काँग्रेस कार्यालयाबाहेर माराहण करण्यात आली आहे. अभिनेत्री महिला आरक्षण बिलासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी गेली होती. पण अर्चना आणि तिच्या वडिलांना काँग्रेसच्या पार्टी कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
या घटनेनंतर अर्चनाने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तिने सांगितले की, 'माझी लढाई सुरूच राहिली. मी शांत बसणार नाही. जे माझ्यासोबत झाले हे खूपच वाईट होते.' या घटनेप्रकरणी अर्चना आणि तिचे वडील मेरठ येथे आज तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ती पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अभिनेत्री अर्चना गौतमने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंग इंडस्ट्रीत तिचे नाव प्रसिद्ध आहे. यासोबतच तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. २०१४ मध्ये तिला 'मिस उत्तर प्रदेश'चा किताब मिळाला होता. यानंतर २०१८ मध्ये तिने 'मिस बिकिनी इंडिया'चा किताब पटकावला. यानंतर, २०१८ मध्येच तिने 'कॉसमॉस वर्ल्ड'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. बिग बॉसच्या १६व्या सीझनमध्ये अर्चना सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातूनच तिला खरी ओळख मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.