Mirzapur The Film Saam tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Mirzapur The Film: ‘मिर्झापूर: द फिल्म’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मुन्ना भैया, कालीन भैया आणि गुड्डू पंडितसह लोकप्रिय पात्रांचा थरार पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Mirzapur The Film: ॲमेझॉन प्राइमवरील लोकप्रिय आणि प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मिर्झापूर: द फिल्म’मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा या विश्वाचा थरार, सत्तासंघर्ष, डार्क ह्युमरचा अनुभव घेता येणार आहे. मालिकेतील अनेक लोकप्रिय पात्रं या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आज चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘मिर्झापूर’ सिरिजने ओटीटीच्या सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती. सिरिजमध्ये अनेक संवाद आणि प्रसंग आजही सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून चर्चेत असतात. आता याच लोकप्रिय फ्रँचायझीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यात आली आहे. चित्रपटाचा दमदार ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुन्ना भैया, कंपाउंडर आणि बाऊजी पुन्हा दिसणार

‘मिर्झापूर’च्या ट्रेलरमध्ये मृत पावलेली महत्त्वाची पात्रं चित्रपटात पुन्हा पाहायला मिळणार आहेत. मुन्ना भैया, कंपाउंडर, बाऊजी आणि बबलू पंडित यांसारख्या पात्रांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे सिरिजच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. तसेच, कालीन भैया, मुन्ना भैया, सत्यानंद त्रिपाठी, गुड्डू पंडित आणि गुड्डू पंडित यांच्यासह यावेळी कथेत काही नवीन पात्रांचीही एन्ट्री होणार आहे.

तगडी स्टारकास्ट

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, जितेंद्र कुमार, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल चौहान, अनंगशा बिस्वास, शाजी चौधरी, सत्येंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा आणि सुशांत सिंग यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

४ सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार रिलीज

‘मिर्झापूर: द फिल्म’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिकेचे निर्माते गुरमीत सिंग यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज हे सह-निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT