Actress Injured saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Actress Injured: अभिनेत्री मिमी चक्रवर्तीचे सूजलेल्या चेहऱ्याचे आणि जखमी ओठांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभिनेत्रीने पोस्टद्वारे तब्येतीची स्थिती सांगितल्यानंतर चाहते चिंतेत पडले.

Shruti Vilas Kadam

Actress Injured: बंगाली मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि माजी तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. मिमी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा चेहरा सुजलेला असून ओठांवर जखमेच्या खुणा दिसत आहेत. तसेच त्यांच्या पायाला त्रास होत असल्याचेही एका फोटोमधून दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मिमी यांच्या चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली असून, त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे.

मिमी चक्रवर्तीला नेमकं काय झालं?

मिमी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचा एका गाल सूजलेला दिसत आहे. ओठावरही दुखापतीची खूण आहे. याशिवाय त्यांच्या पायांमध्येही त्रास असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या सगळ्यामागचे कारण सांगितले आहे. मिमी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, त्यांचा एक दात काढण्यात आला असून त्यामुळे एका गालाला सूज आली आहे. त्यांना काही टाकेही पडले आहेत. याशिवाय ओठाला दुखापत झाली असून पायांमध्ये क्रॅम्प्स येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

मिमी यांच्या या पोस्टनंतर चाहते चिंतेत आहेत. अनेकांनी अभिनेत्रीला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘स्वतःची काळजी घ्या’, ‘लवकर बऱ्या व्हा’, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. काही चाहत्यांनी मिमीवर प्रेमाचा वर्षाव करत त्या लवकरच पूर्णपणे ठणठणीत होऊन या, अशी इच्छा व्यक्त केली.

मिमी चक्रवर्ती राजकारणातही होत्या सक्रिय

मिमी चक्रवर्ती या बंगाली मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी काही काळ राजकारणातही काम केले. त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या. मात्र, फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. राजकारण आपल्यासाठी नाही, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. २०२२ मध्येच राजीनामा देण्याची इच्छा होती, मात्र त्यावेळी पक्षाने तो स्वीकारला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं होतं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, मिमी चक्रवर्ती नुकत्याच ‘होईचोई’च्या ‘क्वीन्स’ या सीरिजमध्ये दिसल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केसांसाठी महागडे प्रोडक्ट्स नकोत! आजीने सांगितलेल्या 'या' ७ टिप्सने थांबेल हेअर फॉल

Calories in 2 boiled eggs: दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज? प्रोटीन आणि फॅट्सही जाणून घ्या

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT