Sanjay Narvekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sanjay Narvekar : कॉमेडीचा तडका! संजय नार्वेकरांच्या 'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Mhanje Waghache Panje Trailer : अभिनेते संजय नार्वेकर यांचा मराठी चित्रपट 'म्हणजे वाघाचे पंजे'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

लग्न, लग्नासाठी घरच्यांची धडपड आणि मुलीचा आलेल्या स्थळाला नकार या सगळ्या गोष्टी अनेकदा कानावर पडतात. मात्र कुटुंबाची जबाबदारी ही या क्षणी तितकीच महत्त्वाची असते. तर मुलांची मनही यावेळी जपणे महत्त्वाची असतात. या मनस्थितीत अडकलेली एक नवी कोरी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. मराठी अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचा मराठी चित्रपट 'म्हणजे वाघाचे पंजे'चा धमाकेदार ट्रेलर (Mhanje Waghache Panje Trailer) रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे.

'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाच्या समोर आलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. संजय नार्वेकर, दिपाली सय्यद या कलाकारांचा अभिनयाची भन्नाट झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना बांदेकर तिच्या सुंदरतेने, अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतेय. अर्थात चित्रपटात तमन्नावर लग्नाबाबत आलेल संकट ती कशी हाताळणार, आईच्या म्हणण्यानुसार ती लग्न करणार की स्वतःच्या मनाजोगा जोडीदार निवडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

'म्हणजे वाघाचे पंजे' स्टारकास्ट

अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण होणार आहे. या चित्रपटात सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

'म्हणजे वाघाचे पंजे' रिलीज डेट

'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत याने सांभाळली आहे. चित्रपटाला संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे असून लेखक म्हणून संजय नार्वेकर यांनी बाजू सांभाळली आहे. 'म्हणजे वाघाचे पंजे' हा कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट 30 मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Designs Mangalsutra: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करा नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट 5 पॅटर्न

Maharashtra Live News Update: सांगलीत महायुती आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत दाखल

Fire: इंदुरनंतर दिल्लीत अग्नितांडव, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Cham Cham Recipe: रसगुल्लापेक्षा टेस्टी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

बलात्कार प्रकरणात अटक, चाकणकरांचा खरातसोबतचा फोटो समोर, सुषमा अंधारे म्हणाल्या अशा लिंगपिसाट माणसाला...

SCROLL FOR NEXT