बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामुळे सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर चांगलेच चर्चेत पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघे एकत्र खूपच क्युट दिसत आहेत.
अनुराग बासू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनों' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात थोडा अयशस्वी ठरतोय असे बोलायला काही हरकत नाही. कारण चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट तसेच चढउतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पाच दिवसांत किती कमाई केली, जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये
दिवस दुसरा - 6 कोटी रुपये
तिसरा दिवस - 7.25 कोटी रुपये
चौथा दिवस - 2.5 कोटी रुपये
पाचवा दिवस - 2.9 कोटी रुपये
एकूण - 22.15 कोटी रुपये
'मेट्रो इन दिनों' चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो'चा सीक्वल आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटात चार जोड्या पाहायला मिळत आहे. यांच्यामधील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
सारा अली खान-आदित्य रॉय कपूर
कोंकणा सेन शर्मा - पंकज त्रिपाठी
अनुपम खेर - नीना गुप्ता
फातिमा सना शेख - अली फजल
'लाइफ इन अ मेट्रो' हा चित्रपट 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी पाहायला मिळाले. हा देखील एक रोमँटिक ड्रामा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.